आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LBT News In Matathi, Lbt Rise Issue At Jalgaon, Divya Marathi

फेब्रुवारीत ‘एलबीटी’चा उच्चांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा परिणाम एलबीटी उत्पन्नावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात उच्चांक वसुली झाली आहे. एलबीटीतून पालिकेच्या तिजोरीत 5 कोटी 89 लाख रुपये जमा झाले आहेत.
मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रय} केले जात आहेत. जकातीच्या जागी आकारल्या जात असलेल्या स्थानिक संस्था करातून प्रशासनाला सन 2012-13ला 52 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. सन 2013-14 या आर्थिक वर्षात किमान 85 कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. वादग्रस्त प्रकरणानंतर एलबीटीचे सहायक आयुक्त उदय पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी दुसरा अधिकारी नियुक्त केलेला नाही. उपायुक्त प्रदीप जगताप यांनी आहे त्या यंत्रणेकडून काम करवून घेतले.
याच विभागातील काही कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. आर्थिक वर्ष सरत असताना कारवाई व बदल्यांच्या सपाट्यामुळे एलबीटीच्या उत्पनात घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. एलबीटी अधीक्षक सतीश शुक्ल यांच्या जागी निरंजन सैंदाणे यांची नियुक्ती केली आहे. नवख्या अधीक्षकांकडून दिलेली जबाबदारी झेपवेल की नाही? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यात गेल्या चार वर्षांच्या तुलने सर्वाधिक उत्पन्न आले आहे. 2011च्या फेब्रुवारीत 4 कोटी 62 लाख, 2012ला 4 कोटी 92 लाख, 2013ला 4 कोटी 27 लाख व यंदा 2013मध्ये 5 कोटी 89 लाख उत्पन्न मिळाले.