आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबीने तयार केला जिल्ह्याचा ‘क्राइम मॅप’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्थानिक गुन्हे शाखेने तयार केलेला जिल्ह्यातील हाच ताे क्राइम मॅप.)
जळगाव- जिल्ह्यातीलवाढत्या गुन्हेगारीवर यंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने "क्राइम मॅप' तयार केला अाहेे. यात काेणत्या भागात गुन्हेगारी जास्त अाहे, काेणत्या प्रकारचे गुन्हे काेणत्या भागात घडतात, या सर्वांचा उल्लेख या नकाशात करण्यात अाला अाहे. त्यामुळे पाेलिस ठाण्याच्या प्रभारी अिधकाऱ्यांना गस्त नेमकी काेणत्या भागात लावावी हे साेपे जाणार असल्याचे एलसीबीचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले.
एलसीबीने जिल्ह्याचा क्राइम मॅप बनवला अाहे. तसेच ते शहरातील शहर, रामानंदनगर, शनिपेठ, एमअायडीसी, जिल्हापेठ तालुका पाेलिस ठाण्यांचाही क्राइम मॅप लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे रायते यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक ठाण्यातील गाेपनीय विभागातील कर्मचाऱ्यांना बाेलावून हा नकाशा तयार करण्यात येणार अाहे.