आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबीत होतेय केवळ फोटोसेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - गेल्या अनेक दिवसांंपासून कारवाईत शून्य ठरत असलेल्या धुळे एलसीबीने अल्पवयीन मुलाकडून चार मोटारसायकली जप्त केल्या. विशेष म्हणजे, या कारवाईची िटप अधिकार्‍यांना मिळाली असताना केवळ आपली शेखी मिरवण्यासाठी एलसीबीच्या पथकाने फोटोसेशनची संधी सोडली नाही. त्यामुळे एलसीबीचे कर्मचारी इतर वेळी करतात काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहर परिसरातून दुचाकीचोरी हाेण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. असे असताना पोलिसांना चोर सापडणे तर दूरच, पण चोरीस गेलेली दुचाकी मिळेल त्या स्वरूपात जप्त करणेही कठीण झाले आहे. अशा वेळी शोधपथक म्हणून ओळख असलेल्या एलसीबीची जबाबदारी वाढते. परंतु, या विभागातील कर्मचार्‍यांच्या कारवाईचा आलेख सध्या उतरता आहे. मात्र, याबाबत कोणीही जाब विचारताना दिसत नाही.

शहरातून चोरीस गेलेली दुचाकी (क्र.एमएच-१८/एजी-२४३९) जामचा मळा वसाहतीत राहणार्‍या १७वर्षीय अल्पवयीन मुलाकडे आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग एलसीबीचे निरीक्षक देविदास पाटील यांना मिळाली होती. तोपर्यंत याबाबत एलसीबीच्या कर्मचारी पथकाला साधी कल्पनाही नव्हती. अधिकार्‍यांनी सांगितल्यावर हे पथक कारवाईसाठी रवाना झाले. त्यानंतर संबंधित मुलाकडून माहितीत नमूद केलेली मोटारसायकल इतर तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या चार मोटारसायकलींची किंमत पोलिसांनी एक लाख २० हजार रुपये आकारली आहे. मात्र, केवळ अधिकार्‍यांच्या विश्वासावर चालणार्‍या या पथकाने शुक्रवारी सकाळी उत्साहाच्या भरात आपले फोटोसेशनही उरकले. तथापि, अधिकार्‍यांच्या टिपवर फुकटचे श्रेय घेऊ पाहणारे एलसीबीचे कर्मचारी इतर वेळेत करतात काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत संबंधितांनीच जाब विचारणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, एमएच-१८/एजी-२४३९ या क्रमांकाची मोटारसायकल प्राॅपर्टी ब्राेकर्स स्वप्निल देविदास संघवी (३८) यांची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आठ दिवसांत कारवाई शून्य
सिंघवीयांची दुचाकी मे रोजी चोरीस गेली होती. गेल्या आठ दिवसांत एलसीबी कर्मचार्‍यांना चोरट्यांची माहिती मिळणे, हे त्यांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. यासोबतच धुळे शहर पोलिसांना गुन्हा दाखल करावासा वाटला नाही का ? असा प्रश्नही पडतो. मोटारसायकल चोरीस गेल्यानंतर बर्‍याच वेळा तिची िकंमत अधिक लावली जात नाही, असा आजवरचा अनुभव आहे. परंतु, चोरीचा मुद्देमाल जप्त झाल्यावर त्याची किंमत पोलिसांकडून अधिक आकारली जाऊन कारवाईची महती वाढवण्याचा प्रयत्न होतो. हाच िकत्ता एलसीबीनेदेखील गिरवला आहे.
बातम्या आणखी आहेत...