Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Learn English And Maths From Cartoon Book

कॉमिक्समुळे झाले गणित, इंग्रजी मजेशीर

प्रतिनिधी | May 15, 2012, 08:39 AM IST

  • कॉमिक्समुळे झाले गणित, इंग्रजी मजेशीर

जळगाव - सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषय मजेशीर पद्धतीने शिकण्यासाठी बाजारात कॉमिक्स पॅटर्नची पुस्तके उपलब्ध आहेत. सुट्यांमध्ये मुले खासकरून कॉमिक्सवर भर देत असतात. आता ते या पुस्तकांद्वारे गणित आणि विज्ञानाची प्रश्नोत्तरे अचूक सोडवू शकतील. लहान मुलांची पसंती ओळखत मार्केटमध्ये कॉमिक्स पॅटर्नमध्ये सायन्स आणि गणिताची पुस्तके आणण्यात आली आहेत. त्यात कॉमिक्समधील पात्र इंग्रजी, गणित, सायन्स, सामान्य ज्ञानावर आधारित प्रo्नांची उत्तरे शोधण्याची युक्ती सांगतात. तसेच त्यावरील फोटो आणि अँनिमेशन मुलांना वाचलेले अधिक वेळेपर्यंत लक्षात ठेवण्यासाठी मदत करतात. प्ले-ग्रुपपासून ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयांबद्दल गोडी निर्माण होऊन अभ्यासदेखील व्यवस्थितरीत्या होणार आहे.

हा मार्ग आहे सोपा - कॉमिक्सच्या माध्यमातून शिकवणे सोपे जाणार आहे. लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये ग्राफिकल प्रेझेंटेशन करण्यात येते; त्याचप्रमाणे हे आहे. त्यामुळे त्यांना विषय खूप वेळ लक्षात राहतो आणि शिकण्याबाबतही आवड निर्माण होते.

वाचलेले खूप वेळ राहते लक्षात - प्रत्येक मुलाची मानसिकता वेगळी असते. प्रत्येक विषय व टॉपिक मुलांना समजतोच असे नाही; परंतु मुलांना कॉमिक्स वाचण्याची हौस असल्याने गणित, विज्ञान व इतिहासासारखे कठीण विषय कॉमिक्स व चित्रपटाच्या आधारे मुलांना जास्त वेळेपर्यंत लक्षात राहतात.
या प्रकारची आहेत कॉमिक्स पुस्तके
> मार्केटमधील कॉमिक्स पॅटर्न बुकमध्ये कोणत्याही कठीण विषयाला समजण्यासाठी डायलॉग लिहिण्यात आलेले आहेत.
> सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी कॉमिक्समध्ये हीरो दुश्मनच्या कचाट्यात अडकलेले दाखविण्यात आले आहेत. म्हणजे, प्रत्येक उत्तर बरोबर दिल्यास समोर रस्ता उघडतो. तसेच विषयाला अनुसरूनच प्रश्न विचारण्यात येतात.
> कॉमिक्समधील पात्रे नेहमी आपल्या आवडीच्या डायलॉगमध्ये गणित व सायन्सच्या कोणत्याही सूत्राच्या आधारावरच बोलतात. ते सतत वाचल्याने नेहमीसाठी लक्षात राहतात.
> पुस्तकांतील पात्रेसुद्धा विषयाशी जोडलेली असतात. म्हणजे, गणिताच्या पुस्तकामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार असतात.
> त्यामध्ये गंभीर विषय पात्रांसोबत साधी व सोपी भाषा वापरून समजावण्यात येतात. त्यासाठी खास गोष्ट तयार करण्यात येते.
> ही कॉमिक्स पात्रांची पुस्तके प्ले-ग्रुप ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असतात.
सुट्यांमध्ये मुले खूप गोंधळ घालतात. त्यामुळे त्यांना खूप समजवावे लागते. पालकांसाठी तर ही सत्त्वपरीक्षाच असते. त्यामुळेच त्यांना मी या प्रकारची पुस्तके नेहमी वाचायला देत असते. म्हणजे, वेळ जातो, ते शांत बसतात आणि ज्ञानही मिळते. रंजना बडगुजर, पालक
वर्षभर तोच तो अभ्यास करून आम्हाला कंटाळा येतो. कॉमिक्समध्ये वेगळे पाहायला मिळते. मस्त कार्टून असतात, कोडे असतात. त्यामुळे अभ्यासही होतो आणि मजादेखील येते. आर्या जोशी, विद्यार्थिनी

Next Article

Recommended