आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘लर्निंग लायसन्स’ आता ऑनलाइन अपॉइंटमेंटद्वारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रादेशिकपरिवहन कार्यालयात लर्निंग लायसन्स (शिकाऊ अनुज्ञप्ती) काढण्यासाठी आता तासन‌्तास रांगेत उभे राहावे लागणार नसून, कार्यालयात येण्यापूर्वी घरबसल्याच संकेतस्थळावर संपर्क साधून अधिकाऱ्यांचा वेळ घ्यावा लागणार आहे.
महिनाभरापासून ही कार्यप्रणाली अंमलात येत असली, तरी येत्या शुक्रवार (दि. ५)पासून ऑनलाइन अपॉइंटमेंटशिवाय लर्निंग लायसन’च काढता येणार नसल्याचे परिवहन विभागाने जाहीर केले आहे. या निर्णयामुळे तासन‌्तास लागणाऱ्या रांगा आ‍णि ग्राहकांना वारंवार मारावे लागणारे हेलपाटे बंद होणार आहेत. अर्जदाराने ऑनलाइन अर्ज केल्यास त्यास कार्यालयाकडून मिळालेल्या वेळेस संबंधित दिवशीच रांगेत उभे राहता थेट प्रवेश मिळणार आहे. सहाय्यक परिवहन अधिकारी जे.जी. पवार यांनी माहिती दिली.
‘लर्निंग लायसन्स’साठी दररोज उमेदवार हजर असतात. कागदपत्रे तपासून, त्यांचे वाहतूक नियमांचे ज्ञान बघून त्यांना संगणकीय चाचणी घेण्यासाठी पात्र-अपात्र ठरविले जाते. त्यानंतर १५ उमेदवारांची एक बॅच याप्रमाणे दोन वा तीन बॅचमध्ये संगणकीय परीक्षा घेतली जाते. नंतर पावती देऊन त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी बोलावले जाते. सध्याच्या या प्रक्रियेत उमेदवारांचा वेळ, येण्या-जाण्याचा खर्च वाढत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन अपॉइंटमेंटचा पर्याय निवडण्यात आला आहे.
प्रक्रिया होणार गतिमान, सुलभ अन् पारदर्शक
'ऑन लाइनअपॉइंटमेंट सक्तीने झाल्यामुळे अर्जदारांना एजंटकडे जाण्याचा प्रश्नच उरणार नाही. त्यांना घरबसल्या अथवा मोबाइलवरदेखील संकेतस्थळावर संपर्क साधता येणार अाहे. त्यामुळे ‘लर्निंग लायसन्स’ची प्रक्रिया सुलभ पारदर्शक होणार आहे. ग्राहकांचा वेळ, पैसा वाचून कार्यालयातील कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. जे.जी.पवार, साहाय्यकपरिवहन अधिकारी