आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेंटिंग शिकण्यासाठी साठीतही नाही आडकाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. पण संसाराच्या रहाटगाड्यात ती कला शिकायला वेळच मिळाला नाही. मात्र, चिकाटी न सोडता वृद्धापकाळात ही कला अवगत करून वेळेचा पुरेपूर सदुपयोग करून घेतला. वयाच्या 69 व्या वर्षी शकुंतला टोके चिमुकल्यांमध्ये बसून चित्रकलेचे धडे घेत आहेत.


शहरातील रामदास कॉलनीत राहणार्‍या शकुंतला दामोदर टोके यांना शालेय शिक्षण घेत असताना चित्रकलेची विशेष आवड होती. मात्र, शिक्षण घेताना ही कला शिकण्यास मिळाली नाही. इयत्ता नववीत एक वर्षच ड्राइंग हा विषय होता. त्यानंतर चित्रकलेशी फारसा संबंध आला नाही. तथापि, चित्रकला शिकता आली नाही. ही खंत होती. त्यामुळे या वयातही त्याकडे वळले.

डिस्कव्हरी चॅनलमध्ये रस
पाच मुलींचा सांभाळ करताना पेंटिंग जरी शिकायला मिळाले नसले तरी विणकाम, भरतकाम ह्या कला त्यांनी त्यावेळी जोपासल्या. त्यासोबत गाईचे संगोपनही केले. त्यावेळी पोहण्याचीही आवड होती. गाणे शिकण्याचाही प्रय} केला. परंतु वाढत्या वयामुळे रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांना गाणे शिकता आले नाही. आजच्या महिलावर्गापेक्षा शकुंतला यांनी वेगळय़ा पद्धतीने दिनक्रम ठेवला आहे. टीव्हीवरील एक-दोन मालिका सोडल्या तर त्यांना डिस्कव्हरी चॅनल आवडते.

अनेक चित्रे रेखाटले
आठ वर्षात 30 ते 35 चित्रे त्यांनी रेखाटली असून ठाणे आणि जळगाव येथे प्रदर्शनदेखील भरविले आहे. सरविश्वेश्वरैया, गुरू पार्थसारथी राजगोपालाचार्य यांचे हुबेहूब पेंटिंग शकुंतला यांनी रेखाटली आहेत.

ऑइल पेंटिंगचे वेड
वयाची सत्तरी गाठणार्‍या शकुंतला वॉटर कलर आणि ऑइल पेंटिंग शिकण्यासाठी चित्रकार तरूण भाटे यांच्या क्लासमध्ये चिमुकल्यांसोबत धडे घेत आहे. अनेक पालकांनाही त्यांचा हेवा वाटत आहे.