आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपाेत्सवात नगरपालिकेतर्फे लावले जाणार ‘एलईडी’ दिवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील प्रमुख मार्गांवर आगामी काळात एलईडी दिवे लावले जाणार आहेत. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. या निविदांना प्रतिसाद मिळाला असून, यातील कमी दराची निविदा मंजूर करण्यासाठी आता सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याने तब्बल चार वर्षांनंतर यंदाच्या दिवाळीत शहराला एलईडी दिव्यांची झळाळी मिळेल, असे आशादायी चित्र आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात तब्बल एक कोटी ३० लाख रुपये निधी खर्च करून एलईडी दिवे लावले जाणार आहेत. गेल्या चार वर्षांपासून शहरातील बहुतांश सर्वच सेंट्रल पोलवरील दिवे बंद आहेत. मेंटेनन्स साहित्य खरेदीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही पुरवठादार मिळाले नाहीत. यामुळे पालिकेने थेट नवीन एलईडी दिवे लावण्यासाठी नियोजन केले. यानुसार तीन महिन्यांपूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एलईडी दिवे लावण्याच्या ठरावाला मंजुरी घेण्यात आली होती. मंजुरीनंतर पालिकेने निविदाप्रक्रिया राबवली. गेल्या चार दिवसांपूर्वीच निविदेची मुदत संपली असून, यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता प्राप्त निविदांपैकी सर्वात कमी दराच्या निविदेला मंजुरी मिळवण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची प्रतीक्षा कायम आहे. आगामी महिनाभरात दिवाळीपूर्वी पालिकेची सर्वसाधारण सभा होऊन त्यात कमी दराच्या निविदेला मंजुरी मिळाल्यास शहरातील एलईडी दिवे लावण्याची स्वप्नपूर्ती होऊ शकते. गेल्या चार वर्षांपासून शहरातील प्रमुख रस्ते दिवाळीतही अंधारात होते. या वेळी मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय प्रक्रिया गतिमान झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हायमास्टमुळे दिलासा : शहरातगेल्या चार वर्षांपासून अंधार आहे. अंतर्गत भागांतील पथदिवे नगरसेवकांच्या पदरमोडीमुळे सध्या कार्यान्वित आहेत, तर आमदार संजय सावकारे यांनी शहरातील तब्बल ४५ ठिकाणी मिनी हायमास्ट दिवे उभारल्याने बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. शहरातील अजून काही भागांमध्ये मिनी हायमास्ट उभारण्यासाठी आमदार सावकारे यांचे प्रयत्न आहेत. शहरातील अनेक भागांतील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे किमान हायमास्ट लावल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. पालिकेने एलईडी दिव्यांबाबत तत्परतेने हालचाली करून शहरवासीयांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा आहे.

लवकरच घेणार सभा
Ãशहरातील पथदिव्यांच्या महत्त्वाकांक्षी कामासाठी पालिकेची सर्वसाधारण सभा लवकरच घेणार आहोत. यासाठी तयारी सुरू केली आहे. कमी दराच्या निविदेला मंजुरी देऊन तसेच सर्व अडचणींवर मात करून दिवाळीपर्यंत एलईडी दिवे लावले जातील. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अख्तरपिंजारी, नगराध्यक्ष, भुसावळ

Áप्रात्यक्षिकासाठी प्रयत्न: निविदामंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी पालिकेकडून एखाद्या रोडवर प्रायोगिक तत्त्वावर दिवे लावले जाणार आहेत. यामुळे या दिव्यांचा उजेड किती मिळतो, आठवडाभरात किती वीज लागते याचा? आढावा चाचणीतून घेतला जाईल. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Áसंेट्रल पोलवरएलईडी : यावलरोडवरील महात्मा गांधी यांचा पुतळा ते संत गजानन महाराज मंदिर, गांधी पुतळा ते लोखंडी पूल, गांधी पुतळा ते कोणार्क हॉस्पिटल, बाजारपेठ ठाणे ते नाहाटा चौफुली, गांधी पुतळा ते चाळीस बंगला, रजा चौक ते खडका रोड, शिवाजीनगर भागात एलईडी दिवे लावले जाणार आहेत.

कायम लेखापालांअभावी अडचणी
पालिकेचे कायम लेखापाल खरात हे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून रजेवर आहेत. या काळात तीन लेखापालांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. मात्र, अद्यापही तिन्ही लेखापाल पदभार घेण्यास तयार नाहीत. आगामी काळातही ते पदभार घेतील याबाबत शक्यता नाही. यामुळे पालिकेच्या अडचणी आता पुन्हा वाढल्या आहेत. लेखापाल मिळाल्यास पालिकेतर्फे दिवाळीपर्यंत सीएफएल लावण्याच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतील. पालिकेत कायमस्वरूपी लेखापाल नसल्याने दैनंदिन कामकाजातही अनेक अडचणी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे समस्या मांडूनही हालचाली झाल्या नाहीत.
बातम्या आणखी आहेत...