आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाव्या चळवळीला माेडून काढू, अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सातपुते यांचा निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कन्हैय्याकुमारने खुशाल महाराष्ट्रात यावे. मात्र, येथे येऊन देश तोडण्याची किंवा भारतीय सैन्याला बलात्कारी म्हणण्याची भाषा केली तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सहन करणार नाही. अशा वेळी डाव्या चळवळीला माेडून काढू, असा निर्धार अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री राम सातपुते यांनी शनिवारी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

अभाविपतर्फे ‘जेएनयू का सच’ सांगण्याचे अभियान राज्यभरात राबवले जात आहे. त्यावर सातपुते यांनी सांगितले की, या प्रकाराच्या ४० व्हिडिओ क्लिप अभाविपकडे आहेत. त्या आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस कन्हैय्याकुमारला महाराष्ट्रात संरक्षण देणार आहे. देशाचे तुकडे करण्याची भाषा तसेच आतंकवादी अफजल गुरू याची वर्षी साजरी करणाऱ्यांना संरक्षण दिले जाणार आहे. मात्र, महाराष्ट्रात देशविरोधी घोषणा आम्ही सहन करणार नाही असे सातपुते यांनी सांगितले.

अमळनेर येथील ‘श्रम संस्कार छावणी’च्या शिबिरासाठी अनुदान दिले जात आहे. या छावणी कार्यक्रमातही कम्युनिस्ट विचारधारांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने हा प्रकार थांबवावा, अशी मागणी महानगर मंत्री अमित पाटील, नंदकुमार बिजलगावकर यांनी केली. नवीन विद्यापीठ कायदा लवकर यावा अशी मागणी केली आहे.
7 एप्रिल रोजी व्याख्यान
अभाविपतर्फेएप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता व. वा. वाचनालय येथे ‘जेएनयू का सच’ या विषयावर व्याख्यान हाेणार आहे. या वेळी देवदत्त जोशी मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी सुखदेव काळे, वीरभूषण पाटील, नरेंद्र पाटील, वैभव भावसार आदी उपस्थित होते.

‘जेएनयू’त अड्डा
जेएनयू हा एक ड्रग्जचा अड्डा आहे. यासंदर्भात लेखी तक्रारीही झाल्या आहेत. तेथील सोशल सायन्स विभागातील २०० प्राध्यापक नक्षलवादाचे समर्थन करतात. जेएनयूमध्ये पाकिस्तानचे एजंट आहेत, अशी लेखी तक्रार एका प्राध्यापकाने १९९६ मध्ये केली आहे. मात्र, त्याची चौकशी झालेली नाही असे सातपुते यांनी सांगितले.