आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव मतदारसंघात उमेदवाराचा मूक प्रचार, कार्यकर्ते पोहोचले बालेकिल्ल्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- निवडणुकीच्या दल्या दिवशी उमेदवारांनी एक-दोन कार्यकर्त्यांना सोबत घेत हाऊस टू हाऊस मूक प्रचार केला. याशिवाय त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार कार्यकर्त्यांनीदेखील वेगवेगळे गट पाडून मूक प्रचार मोहीम राबवली. मोबाइलद्वारे स्वतंत्र संपर्क मोहीम हाती घेण्यात आली. वडून कोण येणार? यापेक्षा अमूक उमेदवाराला शहरी ग्रामीण भागात किती मतदान पडेल? याचीच मंगळवारी जोरदार चर्चा रंगली हाेती. कारण या मतांवरच विजयाचे गणित अवलंबून आहे. प्रत्येक गावात पोहोचलो असल्याचा दावा सर्वच प्रमुख उमेदवारांनी केला आहे. चाळीसगाव तालुक्यात १४२ गावे असून १२५ गावांमध्ये उमेदवारांनी किमान अर्धा ते पाऊन तासासाठी फेरी मारली. शहरी भागात प्रचारासाठी वेळ अपूर्ण पडल्याने मंगळवारी उमेदवारांचे कुटुंबीय मूक प्रचार करीत स्वतंत्ररीत्या फिरले. निवडणूक तारखेच्या आदल्या दिवशी उमेदवारांनी मोटारसायकलवर एखाद्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेऊन साकडे घातले.
गावनिहाय मतदानाचे गणित
उमेदवारत्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिवसभर मूक प्रचार केल्यावर रात्री एका ठिकाणी बसून संपूर्ण प्रचार मोहिमेत गावनिहाय मिळालेला प्रतिसादानुसार मतदानाचे गणित बांधत होते. कोणत्या गावाला आपण वीक कोणत्या गावाला आपली परिस्थिती चांगली राहील, याचा अंदाज घेण्यात आला.
सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास ना
मतदानकेंद्रांवर गोंधळ होण्याची शक्यता बोगस मतदानाची भीती उमेदवारांना आहे. यासाठी अशा मतदान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, तांत्रिक कारण पुढे करून ही मागणी फेटाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या ऐवजी व्हिडिओ शूटिंगचे कॅमेरे या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे.
खानावळ बंद, कार्यकर्ते पोहोचले बालेकिल्ल्यात
चाळीसगावशहरात फक्त भाजपचे स्वतंत्र कार्यालय आहे. उमेदवार उन्मेश पाटील यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत प्रचाराची सर्व सूत्रे स्वत:च्या कार्यालयातून हलवली. त्यामुळे निवडणूक काळात घाटे कॉम्प्लेक्समधील पक्ष कार्यालयाला कुलूप होते. राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांनीदेखील आपले सूत्र घाट रोडवरील ‘राजगड’ या त्यांच्या निवासस्थानातून हलवले. शिवसेनेचे रामदास पाटील अपक्ष उमेदवार रमेश गुंजाळ यांनी प्रचाराचे सूत्र आपल्या निवासस्थानातून हलवले. तर काँग्रेसचे उमेदवार अशोक खलाणे यांनी भडगाव रोडवरील त्यांच्या कार्यालयातून निवडणुकीसाठी रणनीती आखली. या सर्व ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी दिवसभरासाठी भट्टी पेटवण्यात येत होती. प्रचार संपताच भट्टी बंद होऊन कार्यकर्ते आपआपल्या बालेकिल्ल्यात पोहोचले. त्यामुळे १५ दिवसांपासून दिवसभर गजबज असलेल्या उमेदवारांच्या स्वत:च्या कार्यालयांमध्ये मंगळवारी शुकशुकाट होता.