आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Legislative Assembly For Youth Vote, Latest News In Divya Marathi

शहरात तरुण मतदार ठरणार निर्णायक, जळगाव शहरात 18 ते 29 वयोगटातील 86 हजार 991 मतदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिका,विधानसभा आणि लोकसभेला वेगवेगळा कौल देणा-या शहर मतदारसंघातील 25 टक्के युवक मतदार या वेळीदेखील कोणाच्या बाजूने उभा राहणार यावरच शहरातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. शहर मतदारसंघात 18 ते 29 वयोगटातील 86 हजार 991 मतदार या वेळी निर्णायक ठरणार आहेत.
जात, पक्ष, नगरसेवक, व्यक्ती प्रभावित क्षेत्र, अर्थकारण या गोष्टी विचारात घेऊन विजयाची समीकरणे मांडणा-या उमेदवारांचे भवितव्य मात्र युवकांच्या हाती असल्याची स्थिती आहे. गेल्या दीड वर्षात दोन वेळा निवडणुकीला सामोरे गेलेल्या युवक मतदारांनी वेगवेगळी भूमिका घेतली.
23 ते 29 वयोगट निर्णायक
शहरातीलतरुण मतदारांमध्ये 23 ते 29 वयोगटातील मतदान निर्णायक आहे. या वयोगटाचे 57 हजार 500 मतदार शहरात आहेत. गेल्या विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी मतदान केले आहे. त्या वेळी झालेल्या लोकसभा, महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी मतदान केले. दोन्ही निवडणुकीत कौल वेगळा असल्याने येत्या १५ रोजीचा त्यांचा कौल कोणाला, यावर उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
यांचीही भूमिका महत्त्वाची
शहरातीलसुशिक्षित वर्गाचा कौल कोणाच्‍या बाजूने असणार, यावरदेखील बरेचशे गणित अवलंबून आहे. डॉक्टर, प्राध्यापक, शासकीय नोकरदार, रोटरी सारख्या संघटना, खासगी कंपन्या आणि व्यापारी वर्गाचा कौलही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहेत.