आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक लढतीसाठी प्रतिष्ठा पणाला, मतदारसंघातील उमेदवारांचे कसे आहे विजयाचे गणित?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद पॅटर्न
जळगाव- राजकीय अर्थकारणाला गती देणा-या विधान परिषद निवडणुकीत भाजपने इतर पक्षांशी हातमिळवणी केली होती. त्याच प्रकारचे प्रयत्न शहरात पुन्हा सुरू झाले आहेत. शहरात आमदार सुरेश जैन यांच्याविरोधात सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार एकवटले आहेत. प्रत्येकाची विजयासाठीची समीकरणे वेगवेगळी असली तरी त्यामुळे होणारे मतविभाजन विरोधकांच्या पथ्यावर पडणारे आहे. असे होऊ नये, म्हणून इतर पक्षांशी आतून हातमिळवणी करून शिवसेनेला शह देण्याचे प्रयत्न भाजपच्या एका गटाकडून सुरू आहेत. मात्र, कोणत्या उमेदवाराला पाठबळ द्यायचे आणि कोणाला शस्त्र मॅन करायला लावायचे याबाबत एकमत होते नसल्याने हा प्रस्ताव सध्या चर्चेपुरताच मर्यादित राहिला आहे.

जैन यांच्या गैरहजेरीचा फटका
आमदार सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत प्रचाराची धुरा सांभाळणारे त्यांचे कुटुंबीय, समर्थक यांना त्यांच्या गैरहजेरीचा फटका बसत आहे. दिवसा त्यांच्यासोबत असलेले काही जण रात्री दुसऱ्याच उमेदवाराच्या तंबूत असतात. यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी पूर्णवेळ झोकून देणारे पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी काहीसे तळ्यात-मळ्यात असल्याची स्थिती आहे. या वेळी विराेधात अनेक उमेदवार असल्याने प्रचारात आमदार जैन यांची अनुपस्थिती त्यांच्या समर्थकांना चांगलीच जाणवत आहे.
शिवसेना मनपावरसत्ता, सलग नऊवेळा विधानसभेवर विजय, सर्व समाजाशी उमेदवारांचे चांगले संबंध, लेवा पाटील समाजाचे तीन उमेदवार असल्याने मतांचे विभाजन. घरकुल प्रकरणानंतरही साेबत असलेली कार्यकर्त्यांची फळी यामुळे विजयाची खात्री वाटत आहे.
भाजप आमदार सुरेश जैन यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, लोकसभेत भाजपला मिळालेले मताधिक्य, एकनाथ खडसे यांचा जैनांना असलेला विराेध यामुळे फायदा होईल. नगरसेवक म्हणून वैयक्तिक संबंध, संपर्क जातीय समीकरणात विजयाचा विश्वास.
मनसेमनपानिवडणुकीत मनसेला मिळालेले यश, त्यानंतर राजकीय प्रवाहात येताना मिळालेला सकारात्मक प्रतिसाद, वाढवलेला जनसंपर्क यामुळे नवमतदारांची साथ अन् आमदार जैन विरोधकांचे सहकार्य मिळणार असल्याने विजयाची खात्री वाटत आहे.
राष्ट्रवादीयापूर्वीच्याविधानसभा निवडणुकीत अपक्ष लढूनही क्रमांक दोनची मते मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा अधिक मते होती. या वेळी पक्षाची उमेदवारी, पक्षामुळे मराठा वैयक्तिक लेवा पाटीदार समाजाची मते मिळतीले.
काँग्रेसमुस्लिम,मागासवर्गीय हक्काचे मतदार, उच्चशिक्षित आणि नवा चेहरा असल्याने सुशिक्षित वर्गाचा प्रतिसाद मिळेल. विराेधकांवर भ्रष्टाचाराचे अाराेप, उमेदवार असल्याने मतविभाजनात विजयासाठी आवश्यक मते मिळण्याची अपेक्षा आहे.
बलस्थाने : उच्चशिक्षित,वैद्यकीय संघटनेवर कामाचा अनुभव, पालिका निवडणुकीत सर्वाधिक मते घेणारे एकमेव काँग्रेस उमेदवार, गंभीर अाराेप, गुन्हे दाखल नाहीत.
उणिवा: राजकारणातनवखा चेहरा, जनसंपर्काचा अभाव, पक्षांतर्गत गटबाजीचा फटका, काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष.