आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला जग पाहू दे... सांग अाई-बाबांना, मला जन्म घेऊ दे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरंडोल (जि. जळगाव)
‘तू जसे पाहिले जग,
मलादेखील पाहू दे
सांग अाई-बाबांना,
मला जन्म घेऊ दे..!’
चाळीस भाषांमध्ये भाषांतरित हाेऊन लाखाे भारतीयांपर्यंत गेलेली ही प्रा. वा. ना. अांधळे यांची कविता अाता इयत्ता ११वीच्या अभ्यासक्रमात शिकायला मिळेल. ‘लेक वाचवा’ अभियानाची दखल घेऊन युवकभारती पाठ्यपुस्तकात तिचा समावेश करण्यात अाला अाहे.

एरंडाेलचे गझलकार व धरणगाव येथील उपप्राचार्य कवी प्रा. वा. ना. आंधळे २०१० पासून ‘लेक वाचवा’ हेे अभियान राबवत अाहेत. २००६ मध्ये त्यांनी लिहिलेली ही कविता मुंबईतील दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर २०१० मध्ये मुंबईतील प्राध्यापकाने या कवितेचे पाेस्टर लावण्याची सूचना केली. त्यानुसार प्रा. अांधळे यांनी १०० पाेस्टर एसटी बसमध्ये लावले. त्यानंतर या कवितेचा प्रसार जाेरात झाला. मराठीनंतर ती हिंदीत तयार झाली. त्यानंतर इंग्रजी, गुजराती, तामिळ, कन्नड, बंगालीसह विविध भाषा व बाेलीभाषेत प्रसिद्ध झाली. या कवितेचे अातापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त पाेस्टर तयार झाले असून अनेक दुकानदारांनी अापल्या दुकानांच्या पिशव्यांवर कविता छापून तिचा प्रसार सुरू केला. काही ठिकाणी सामूहिक विवाह समारंभात कवितेची फ्रेम करून वधू-वरांना दिली जाते, तर अनेक कन्या शाळांमध्ये तिचे गायन केले जाते.

...अाई मला जन्म घेऊ दे, ४० भाषांमध्ये गेली!
कीर्तनातून, भेटकार्ड, शालेय वह्यांच्या पृष्ठावरून, महाविद्यालयाच्या नियतकालिकांतून, विविध दिनदर्शिका, कापडी पिशव्यांवर ही कविता देशभर छापली जाते. अाता डी. डी. किसान या चॅनलवर ‘सावित्री : एक क्रांती’ मालिका तयार हाेत अाहे. या मालिकेतील शीर्षकगीत म्हणून या कवितेची निवड केली अाहे. कवितेचे एक घाेषवाक्य तयार केले अाहे. ‘लेकी तुझ्या हाकेने, खरंच कमाल केली, अाई मला जन्म घेऊ दे, ४० भाषांमध्ये गेली.’

अाता काेरियन, रशियन भाषेतही
इंटरनेटच्या माध्यमातून कवितेचा प्रसार जगभरात झाला. अाता उत्तर प्रदेशातील प्रा. पूनम चाैधरी या कवितेचे काेरियन, रशियन व फ्रेंच भाषेत भाषांतर करणार अाहेत. युनिसेफमध्ये ही कविता जावी यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी खास पत्र लिहून प्रा. अांधळे यांचे कवितेबद्दल अभिनंदन केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...