आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बालक ठार, सातवा बळी; मालेगाव तालुक्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- वरखेडेतील बिबट्याने बुधवारी सातवा बळी घेतला. लघुशंकेला झाेपडीतून बाहेर उभ्या असलेल्या ७ वर्षीय बालकास बिबट्याने ठार केले. ही घटना मालेगाव तालुक्यातील साकूर शिवारात घडली.  तत्पूर्वी, उपखेडेजवळ महिलेवर हल्ला करून बिबट्याने जखमी केले हाेते. शेतातील झाेपडीत राहणाऱ्या कुटुंबातील  कुणाल प्रकाश अहिरे (७) हा लघुशंकेसाठी झाेपडीतून रात्री ९.३० वाजता बाहेर उभा राहीला. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. अारडाअाेरड करताच बिबट्या त्याला घेऊन उसाच्या शेतात पसार झाला.

 

 

बातम्या आणखी आहेत...