आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाेध माेेहीम सुरू वरखेडेत; बिबट्याचा हल्ला उपखेडेत; महिलेवर घातली झडप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- जळगाव जिल्ह्यातील वरखेडे या गावात वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू असतानाच त्याने उपखेडेजवळील मांजरी शिवारात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बुधवारी झडप घातली. यावेळी इतर महिलांनी अारडाअाेरड केल्याने बिबट्याने धूम ठाेकली. बिबट्याच्या हल्ल्यात गायत्री सुरेश पाटील (३८) जखमी झाल्या अाहेत.  


गायत्री पाटील यांच्या मानेला व हाताला बिबट्याने चावा घेतल्याने खाेलवर जखमा झाल्या अाहेत. त्यांना चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरखेडेे, दरेगावात शाेध माेहिम राबवत असलेल्या वनविभागाच्या पथकाची धावपळ उडाली. शार्पशुटर्स व ठसे तज्ज्ञ तातडीने उपखेडकडे रवाना झाले. तेथे बिबट्याचे ठसे मिळून अाले. कापसाच्या झाडांच्या पानांवर रक्ताचे डाग अाढळले. 


बुधवारी सकाळी उपवनसंरक्षक अादर्शकुमार रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय माेरे यांनी वन विभागाचे कर्मचारी तसेच शार्पशुटर्सची बैठक घेऊन शाेध माेहिमेचा अाढावा घेतला. त्यानंतर प्रत्येकी सात कर्मचाऱ्यांच्या १० टिम बिबट्याच्या शाेध मोहिमेसाठी रवाना झाल्या. वरखेडे, तिरपाेळे, पिंपळवाड म्हाळसा शिवारात शाेध माेेहिम राबवत असताना बिबट्याने तेथून पाच किलाेमीटरवर उपखेड येथे दुपारी महिलेवर हल्ला केला. 


अातापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला अाहे. जखमी झालेल्यांची संख्या १२ असून हे सर्वच जखमी लहान मुले अन् महिलाच अाहेत. बिबट्याला जाळ्यात पकडण्यासाठी वन विभागाने १० हजार एकर क्षेत्रात १० मानवी मनाेरे लावण्याचे काम हाती घेण्याचे ठरवले अाहे. त्यातील सात मनाेरे यापूर्वी बिबट्याने हल्ला केलेल्या ठिकाणी लावले जाणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...