आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Attacks; Photographer Injured Issue At Jalgaon

बिबट्याचा हल्ला; छायाचित्रकार जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे (पानाचे) येथे सोमवारी दुपारी पानमळ्यात लपून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार कालू शहा यांच्यासह तिघे जखमी झाले. बिबट्याने शहा यांचा डावा हात आणि पायाला चावा घेतला. धाडस दाखवून त्यांनी बिबट्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.
कुर्‍हे पानाचे गावापासून मोंढाळे गावादरम्यान अडीच किमी अंतरावर असलेल्या पंडित रंदाळे यांच्या मालकीचा पानमळा आहे. सकाळी ते व त्यांचा चुलत भाऊ रामदास सुपडू रंदाळे हे शेतात गेलेले असताना 11 ते 12 वाजेदरम्यान मळ्यात बसलेल्या बिबट्याने रामदास यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या बचावासाठी आलेल्या पंडित रंदाळे यांच्यावरही बिबट्याने झडप घालत हल्ला केला. हल्ला झाल्यामुळे दोघेही बेशुद्ध झाले. त्यावेळी आजूबाजूच्या शेतातील हिरालाल परदेशी, रमेश बोबडे, सखाराम रंदाळे यांच्यासह शेतकर्‍यांनी धाव घेत जखमींना हलवले

कालूचे बळ अन् बिबट्याचा पळ
पानमळ्याच्या शेतात कालू शहा बिबट्याच्या शोध घेत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घेतली. त्यांच्या डाव्या हाताला दातांनी चावा घेताच शहा यांनी उजव्या हाताने बिबट्याच्या मानेवर ठोसा लगावला. त्यानंतर पुन्हा झडप घेण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला जोरदार आवाज देत प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्या पुन्हा पानमळ्यात पळाला.