आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदरलेल्या अन‌् भुकेने व्याकूळ बिबट्याचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जंगलात अन्न पाणी मिळत नसल्याने शहरानजीक बिबट्यांचा वावर वाढत चालला अाहे. याचा प्रत्यय रविवारी अाला. शहरापासून २५ किलाेमीटर अंतरावरील रवंजा शिवारात शिकाऱ्याने जंगली डुकरे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात शनिवारी मध्यरात्री फूट उंच २.१८ मीटर लांब बिबट्या अडकला.

बाहेर निघण्यासाठी बिबट्याने सुमारे १२ तास जिवाचा अाकांत करून सुटकेचा प्रयत्न करीत हाेता. याचवेळी त्याला पाहण्यासाठी नागरिकांची ताेबा गर्दी झाल्याने भेदरलेल्या अन् भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्याचा रविवारी दुपारी १२ वाजता तडफडून मृत्यू झाला.

रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास मोठा रवंजा गावाचे सरपंच दशरथ कोळी यांना जाळ्यात अडकलेला बिबट्या दिसला. त्यांनी ही माहिती वन विभाग तसेच काही गावकऱ्यांना दिली. या बिबट्याला पाहण्यासाठी सुमारे हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दी पाहून बिबट्या बिथरला. जाळ्यातून बाहेर पडण्याची धडपडही सुरू हाेती. तर दुसरीकडे नागरिकांची आरडाओरडही सुरू होती.

या गोंधळामुळे बिबट्याचा जीवही घाबरत होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास जो जमिनीवर निपचीत पडला. या तीन तासांत वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. बिबट्याच्या हालचाली थांबल्यानंतरही कोणाचीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत कोणी केली नाही. अखेर तो मरण पावला असल्याची खात्री काही नागरिकांना झाली. त्यानंतर नागरिक तेथे पोहोचले. त्यांनी मेलेल्या बिबट्याला जाळ्यातून बाहेर काढले. त्याच्या अंगावर निंबाच्या झाडाचे पाणे टाकून झाकले. तसेच जाळेदेखील काढून घेऊन गेले. हे जाळे कोणी लावले कोण घेऊन गेले याची माहितीदेखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेली नाही. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले.
बातम्या आणखी आहेत...