आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी Live रिपोर्ट : भेदरलेल्या अन‌् भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्याचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरंडाेल तालुक्यातील रवंजा शिवारात शिकाऱ्याने जंगली डुकरे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात शनिवारी बिबट्या अडकला. जाळ्यातून निघण्यासाठी बिबट्यांने १२ तास जीवाचा अाकांत करून सुटकेचा प्रयत्न केला. मात्र, तो सुटू शकला नाही. अखेर भुकेमुळे त्याचा रविवारी मृत्यू झाला. - Divya Marathi
एरंडाेल तालुक्यातील रवंजा शिवारात शिकाऱ्याने जंगली डुकरे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात शनिवारी बिबट्या अडकला. जाळ्यातून निघण्यासाठी बिबट्यांने १२ तास जीवाचा अाकांत करून सुटकेचा प्रयत्न केला. मात्र, तो सुटू शकला नाही. अखेर भुकेमुळे त्याचा रविवारी मृत्यू झाला.
जळगाव - जंगलात अन्न, पाणी मिळत नसल्याने शहरानजीक बिबट्यांचा वावर वाढत चालला अाहे. याचा प्रत्यय रविवारी अाला. शहरापासून अवघ्या २५ किलाेमीटर अंतरावरील रवंजा शिवारात शिकाऱ्याने जंगली डुकरे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात शनिवारी मध्यरात्री फूट उंच २.१८ मीटर लांब बिबट्या अडकला. जाळ्यातून निघण्यासाठी बिबट्यांने सुमारे १२ तास जीवाचा अाकांत करून सुटकेचा प्रयत्न केला. याचवेळी त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची ताेबा गर्दी झाल्याने भेदरलेल्या अन् भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्याचा रविवारी दुपारी १२ वाजता उन्हातच तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, वनविभागाकडे बिबट्याला साेडवण्यासाठी साहित्य असते तर त्याचा जीव वाचला असता.

रवंजा (ता. एरंडाेल) शिवारात जंगली डुकरे माेठ्याप्रमाणात अाहेत. त्यामुळे त्यांच्या मांसाची तस्करी करण्यासाठी शिकारी सक्रिय असतात. शनिवारी शिकाऱ्याने एका उसाच्या शेताला लागूनच सुमारे २५ फूट रुंद सुताचे जाळे (वाघर) लावले होते. या जाळ्यात मध्यरात्री फूट उंच २.१८ मीटर लांब बिबट्या अडकला. रात्रभर ताे जीवाचा अाकांत करून अापली सुटका करण्याचा प्रयत्न करीत हाेता. रविवारी सकाळी वाजता मोठा रवंजा गावाचे सरपंच दशरथ कोळी यांना जाळ्यात अडकलेला बिबट्या दिसला. त्यांनी याबाबत लागलीच वनविभाग ग्रामस्थांना माहिती दिली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळावर तब्बल हजारांपेक्षा जास्त ग्रामस्थांची गर्दी झाली हाेती. ही गर्दी पाहून बिबट्या प्रचंड भेदरला. त्याने उड्या मारणे, गुरगुरण्याची क्रिया सातत्याने सुरू ठेवली. काहीही करून जाळ्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न तो करतच होता. तर दुसरीकडे ग्रामस्थांचा गोंगाट सुरू हाेता. गर्दीमुळे भेदरलेल्या अन् भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्याचा रविवारी दुपारी १२ वाजता तडफडून मृत्यू झाला. बिबट्याच्या हालचाली मंदावल्यानंतरही कोणाची त्याच्या जवळ जाण्याची हिंमत हाेत नव्हती. काही ग्रामस्थांनी हिंमत दाखवून बिबट्या मरण पावल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांनी मेलेल्या बिबट्याला जाळ्यातून बाहेर काढले. त्याच्या अंगावर निंबाच्या झाडाची पाने टाकून त्याला झाकले. त्यानंतर दुपारी १.३० वाजता वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बी.एस.पाटील, वनपाल सुनील पवार, शब्बीर तडवी, टी.वाय. देवरे, बोरसे हे घटनास्थळी दाखल झाले. या वेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बिबट्या जिवंत असताना तुम्ही का अाले नाही? असा तीव्र शब्दात संताप करीत नाराजी व्यक्त केली. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू हाेता. या वेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हे जाळे कुणी लावले याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ती मिळाली नाही. पाटील यांच्या पथकाने बिबट्याचा ताबा घेत त्याला पद्मालय येथे आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, रवंजा शिवारात गेल्या महिन्यात अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. एक नर मादी अशी जोडी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पुढे वाचा...
> बिबट्यांचा शहराजवळ वावर वाढतोय
> वनविभागाकडे साहित्यांचा अभाव
बातम्या आणखी आहेत...