आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिबट्याचा वृद्धेवर हल्ला, नातू, मुलासमक्ष नेले फरपटत; बिबट्याच्या हल्ल्यात गेला सहावा बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- गिरणा पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने मंगळवारी पहाटे सहावा बळी घेतला. वरखेडे येथे दरवाजा नसलेल्या झाेपडीत गाढ झाेेपेत असलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेस बिबट्याने फरपटत नेले. दरम्यान, वृद्धेला बिबट्या नेत असताना मुलासह नातवाने पाहिले.  मुलाने बचावात्मक पवित्रा घेत मारून फेकलेला भाला बिबट्याला चाटून गेला. 

 

यमुनाबाई भिला तिरमली (७०, रा.वरखेडे खुर्द-लहान वरखेडे) असे मृत वृद्धेचे नाव अाहे.  झोपडीच्या मागच्या खोलीत सावत्र मुलगा, सून आणि नातू झोपले होते. दार नसलेल्या खोलीत यमुनाबाई झोपल्या होत्या. त्यांच्या जवळच गाय आणि बैलजोडी बांधली होती. मंगळवारी पहाटे बिबट्या आल्यामुळे गायीने हंबरडा फोडला. या आवाजाने यमुनाबाई यांचा मुलगा आणि नातू जागे झाले. त्याच वेळी बिबट्याने जनावरांना लक्ष्य न करता यमुनाबाईंवर हल्ला केला. बिबट्या वृद्धेला फरपटत नेत असल्याचे लक्षात येताच त्यांचा मुलगा संतोष तिरमली याने भाला काढून बिबट्याच्या दिशेने भिरकावला. भाला बिबट्याला चाटून गेला. त्यामुळे घटनास्थळापासून ५० फुटांवर बिथरलेल्या बिबट्याने यमुनाबाईला साेडून धूम ठाेकली. हातात काठ्या, भाला  व बॅटरी घेत तिरमली कुटुंबीय यमुनाबाईजवळ गेले असता बिबट्याने मानच ताेंडात धरून फरपटत नेल्याने यमुनाबाईंचा जागीच मृत्यू झाला हाेता.  हे दृश्य पाहून नातू व मुलाने अाक्राेश केला, तेव्हा भीतीपाेटी घरात लपून बसलेल्या दाेघी महिला व दाेन लहान मुले रडतच बाहेर अाले. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.   

 

हुसकावल्यानंतरही बिबट्या पुन्हा परतला  
यमुनाबाई मृत झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह पंचनाम्यास अडचण नकाे म्हणून तसाच राहू देत माेबाइलवरून गावातील लोकांशी संपर्क साधला. त्या वृद्धेचा मुलगा  आणि नातू जवळच शेकोटी पेटवून तेथेच बसले. पण काही वेळानंतर बिबट्याने अंधाराचा फायदा घेत पुन्हा यमुनाबाईंचा मृतदेह उचलून जंगलात नेला. मुलाला मृतदेह न दिसल्याने काही ग्रामस्थांच्या मदतीने  शोध घेतला असता  १५० फुटांवर यमुनाबाईचे शिर धडापासून वेगळे झालेले दिसून आले. सकाळ होताच शोध सुरू केला. त्या वेळी झाेपडीच्या पाठीमागील खाेल दरीत दाट झाडीत यमुनाबाईंचे धड मिळून अाले.

 

बातम्या आणखी आहेत...