आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25% प्रवेशात केवळ 336 विद्यार्थ्यांचे प्रवेश, प्रवेशासाठी अाणखी 3 दिवसांची मुदतवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आर्थिकदुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागांवर ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सोडतीनंतर शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अवघे ३३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. पहिल्या फेरीत हजार ६६० विद्यार्थ्यांची सोडतीद्वारे निवड झाली होती. यातील केवळ ३३६ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

दरम्यान प्रवेशप्रक्रियेची मुदत १८ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. दुसरी सोडत २० अथवा २१ मार्चला काढण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली. 
पहिल्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभागातर्फे दुसरी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीनंतर पालकांनी संबंधित शाळेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. एखाद्या शाळेने प्रवेश देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित पालकांनी १८ मार्चपर्यंत जि. प. शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करावी. 
 
यासह पालकांना तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येईल. मध्यंतरी शाळांना असलेल्या सुट्यांमुळे अनेक पालकांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही होऊ शकलेले नाहीत. प्रवेशासाठी १५ मार्च ही अखेरची मुदत देण्यात आली होती. यात तीन दिवसांच्या मुदतवाढीचे पत्र शिक्षण विभागास मंगळवारी प्राप्त झाले आहे. शिक्षण विभागातर्फे मार्च रोजी पहिल्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. 
 
 
बातम्या आणखी आहेत...