आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lets Have Attensiong Student, Don't Disappointing Of Result

विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचू नका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चांगले गुण मिळावे यासाठी मुलांवर घरातूनही मोठा दबाव असतो. त्यामुळे परीक्षेच्या निकालापूर्वी ते प्रचंड तणावात असतात व अपयश आल्यावर त्याला सामोरे जाण्याऐवजी चुकीचे पाऊल उचलतात. त्यासाठी पालकांनी मुलांवर दबाव न टाकता त्यांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.


शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. निकालात जर का मुलाला कमी गुण मिळाले किंवा तो नापास झाला, तर पालकांनी न रागवता मुलांची हिंमत वाढवावी. हल्ली मुले करिअर निवडीबाबत अधिक जागरूक झाले असून, पालकांनी मुलांनी उच्च पदवी घेऊन डॉक्टर वा इंजिनिअर व्हावे, असा आग्रह न धरता त्यांच्या आवडी-निवडीनुसार त्यांना करिअर करू द्यावे, असा सल्लादेखील तज्ज्ञांनी दिला आहे.


‘विद्याप्रबोधिनी’तर्फे मार्गदर्शिका
विद्याप्रबोधिनी क्लासेसतर्फे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एका विशेष चार्टचे वाटप करण्यात येणार आहे. चार्ट मिळवण्यासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रकाची झेरॉक्स विद्याप्रबोधिनीच्या ख्वाजामियॉँ दर्गा व मुख्य पोस्ट ऑफिससमोरील शाखेत जमा करावी. त्यानंतर हा चार्ट दिला जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संचालक योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा.


पालकांनो, मुलांना समजून घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार अपेक्षा ठेवा
०मुले नापास झाल्यानंतर त्यांना न रागावता त्यांची हिंमत वाढवावी.
०मुले तणावात असल्यास पालकांनी त्यांचे समुपदेशन करावे.
०अपयश आल्यानंतर पुन्हा आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.


या ठिकाणी मोफत निकाल
०निर्मलाताई पाटील कॉलेज, दुकान नं 10, स्टेडियम
कॉम्प्लेक्स
०भाजपतर्फे मूजे महाविद्यालय, नूतन मराठा, बेंडाळे कॉलेज
०राजे मित्र मंडळ, शिरसोली

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात, जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे गरजेचे
प्रयत्न करत राहावे; यश हमखास मिळते
जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे गरजेचे असते; मात्र त्यात अपयश आले तर खचून जाता कामा नये. आज करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच प्रयत्न करत राहावे; यश हमखास मिळते.
शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक


छोट्याशा तंत्रातही कसब मिळवून करिअर
जीवन सुंदर आहे व ते भरभरून जगले पाहिजे, असे म्हटले जाते. दहावीत जास्त गुण मिळाले म्हणजे सगळे मिळाले असे नाही. कारण आज अनेक विद्याशाखा मुलांना उपलब्ध आहेत. तसेच छोट्याशा तंत्रातही जास्त कौशल्य प्राप्त करून करिअर करता येते.
नीळकंठ गायकवाड, शिक्षणतज्ज्ञ


पालकांनीही मुलांना समजून घ्यावे
अपयशाने निराश न होता विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल करावी. याला अंतिम टप्पा समजू नये. आई-वडीलही मुलांकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा ठेवतात; मात्र त्या पूर्ण होतील की नाही, या विचारानेच मुलांवर दबाव येतो. मुलांना समजून घ्यावे.
विलास सनेर, शिक्षणतज्ज्ञ