आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्त कसा असावा, हे आता जनतेलाच ठरवू द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिका आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांनी पाणीपुरवठा योजनेचे साडेतीन कोटी रुपयांचे बिल काढल्याने गोंधळ उडाला आहे. गृह विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून डॉ.भोसले यांची अाेळख आहे. आयुक्तांच्या कामाची पद्धत पटत नाही, असेच चित्र निर्माण केले जात अाहे. मात्र अायुक्त कसा असावा, हे काेणी जनतेलाच ठरवू द्या, असे मत अामदार अनिल गाेटे यांनी व्यक्त केले अाहे.

आमदार गोटे यांनी म्हटले आहे की, धुळ्यात येण्यास अधिकारी तयार नसतात. तत्कालीन धुळे पालिकेत मुख्याधिकारीपदी रुजू होण्यास स्व.दिलीप पायगुडे तयार नव्हते. त्यांनाही त्रास सहन करावा लागला. जिल्हाधिकारी संजय सेठी जिल्हा पोलिस अधीक्षक आर.के.सहाय यांनीकेलेेले काम धुळेकरांच्या विस्मरणात गेलेले नाही. याचा विचार करता सध्या आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांच्या कामाची पद्धत आणि महापालिका कारभारात बदल घडवून आणण्याच्या कल्पनेचा स्वीकार करणे, ही नागरिकांनीच याेग्य की, अयाेग्य हे ठरवू द्यायला हवे. डॉ.भोसले हे अायुक्तपदी रुजू झाल्यानंतर या पाणी योजनेचे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत का? डॉ.भोसले रुजू होण्यापूर्वी उत्कृष्ट काम करत होते का? मग त्या वेळी कुणी आवाज का काढला नाही? हे धुळेेकरांना समजले पाहिजे.

जनता सुज्ञ आहे. जनतेला नेमका कसा आयुक्त हवा, हे त्यांनीच ठरवावे. पहाटे पाच वाजता शहरातील रस्त्यांवर सफाई कामगारांसमवेत उतरणारा अायुक्त हवा की नको? बाेगस कामांची बिले काढण्याच्या दबावाला बळी पडणारा, मनपा कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्यास देणारा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर निवृृत्तिवेतन मिळवून देणारा, पाचव्या सहाव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्यासाठी प्रयत्न करणारा आयुक्त हवा की नको? याचा नागरिकांनीच विचार करावा, असेही या पत्रकात आमदार अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

धनाडांवर होता दबाव
१५४कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा फाेडण्याचे बेकायदेशीर कृत्य विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहिता असताना तत्कालीन आयुक्त के.व्ही.धनाड यांनी दबावापोटी केले. त्यावेळी मी हरकत घेतली. तसेच तक्रारही केली होती, असेही पत्रकात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...