आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढी उभारू विजयाची!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सृष्टीच्या उत्पत्तीचा दिवस आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणून भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. भारतवर्षात उगम पावलेल्या सर्वच पंथ, संप्रदाय आणि समाजात हा सण साजरा केला जातो. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. शकांनी परकीय हुणांचा पराभव केला तो याच दिवशी. या दिवसापासून शालिवाहन शकास सुरुवात झाली. कारण, शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय याच दिवशी मिळवला होता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाशी निगडित काही बाबी येथे मांडल्या आहेत.


आंब्याच्या झाडाची पाने का?
इतर झाडांच्या पानापेक्षा आंब्याची पाने सात्त्विक असतात. तसेच कोवळ्या पानात तेजतत्त्व अधिक असते. ईश्वरीतत्त्व खेचून घेण्याची क्षमता या पानांमध्ये जास्त असते. त्यामुळे आंब्याची पाने वापरली जातात. तोरणही बांधले जाते.


गुढीवर तांब्या उलटाच का?
दिशा जमिनीकडे असल्याने पोकळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्तीमुळे सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होऊ लागतो.


कडुलिंबाचे महत्त्व काय?
कडुलिंबाची फुले, चण्याची भिजवलेली दाळ, कोवळी पाने, भिजवलेले धणे, जिरे व हिंग याचे मिर्शण यादिवशी खाल्ले जाते. पाडव्याचा काळ हा ऋतुबदलाचा काळ असतो. त्याचा शरीरावर परिणाम होऊ नये यासाठी याचा वापर होतो. विषमज्वर, ताप, शरीरांतर्गत जळजळ आदी व्याधी तसेच त्वचाविकार, रक्तदोष, कृमीप्रादुर्भाव यापासून कडुलिंब वाचवते.


वैज्ञानिक संकल्पना
काळाची अन्य संस्कृतींमधली कल्पना लिनियर अर्थात एकरेषीय आहे. म्हणजे ठरावीक वर्षांआधी काळाला सुरुवात झाली आणि ठरावीक वर्षांनी कयामत येऊन काळ थांबणार. परंतु भारतीय संकल्पनेनुसार काळ चक्रीय अर्थात सायक्लिक आहे. म्हणजे काळ अनादी, अनंत आहे. काळाला आदी नाही, अंतही नाही. युगानंतर नवे युग. विज्ञानाशी सुसंगत अशी ही संकल्पना आहे.


गुढी उभारण्याचे कारण काय?
नववर्षाचे स्वागत करताना गुढी उभारणे ही फार प्राचीन प्रथा आहे. पूर्वीच्या काळात कळकाची काठी वापरली जायची. काळानुरूप बांबू, स्टील पाइप असे बदल होत गेले. पर्यावरणाचे तसेच लतावेलींचे अस्तित्व टिकवणे हा उद्देश. ही गुढी नभाच्या दिशेने उभी करतात. आपली महत्त्वाकांक्षा ‘नभापरी उत्तुंग’ असावी हा संदेश यामागे आहे.


साडेतीन मुहूर्तांपैकी एक
पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत पवित्र मुहूर्त आहे. कोणत्याही शुभकार्यासाठी उत्तम योग आहे. नवीन वर्षाच्या पंचांगाला या दिवसापासून सुरुवात होते. मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे हिंदू बांधवांनी गुढी उभारून या दिवसाचे स्वागत करावे. अनंत भालेराव, गुरुजी


मराठी बोलण्याचा प्रयत्न करा
रावणाचा वध करून गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू र्शीराम परत आले. त्यामुळे हा दिवस यशाचा आणि विजयाचा दिवस आहे. वर्षारंभी प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा प्रतीक्षा कोरगावकर, हिंदू

जनजागृती सभा आध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्व
केवळ प्रथा म्हणून नव्हे आध्यात्मिकदृष्ट्याही पाडव्याला महत्त्व आहे. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. या प्रजापतीच्या लहरी या दिवशी एरवीपेक्षा एक हजार पटीने जास्त असतात. त्याचा अनुभव गुढी उभारून घेता येतो. हेमंत शिंदे, सनातन संस्था