आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार वाचनालयांना टाळे; त्रुटी आढळलेल्या ग्रंथालयांना होणार कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: वाचनालयांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र अनुदान देण्यापूर्वी बंद आणि केवळ कागदावरच असलेल्या वाचनालयांचा शोध घेण्यासाठी पडताळणी करण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 203 ग्रंथालयांची तपासणी करण्यात आली. त्यात चार ग्रंथालये कागदावर असल्याचे निदर्शनास आले. तसेच अन्य त्रुटी आढळून आलेल्या ग्रंथालयांवर नजीकच्या काळात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय संचालनालयाने दिली आहे.
राज्यातील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्या मागणीची दखल घेत केंद्र शासनाने वाचनालयांच्या अनुदानात 1 एप्रिल 2012पासून पन्नास टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, वाचनालयांना अनुदान देण्यापूर्वी सद्यस्थितीत वाचनालयांची स्थिती जाणून घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांच्या आदेशाने राज्यातील वाचनालयांची पडताळणी करण्यात आली. 21 ते 25 मेदरम्यान वाचनालय प्रत्यक्ष सुरू आहेत की फक्त कागदावर? जनतेला वाचनालयामधून किमान ग्रंथालयीन सुविधा मिळतात काय? दर्जानुसार वाचनालयात सुविधा उपलब्ध आहेत काय? आदी बाबींची तपासणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान जिल्ह्यात चार ग्रंथालये बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.