आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलआयसी एजंट भरती; अपूर्ण संदेशामुळे गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एलअायसी एजंट पदाच्या भरतीसाठी माेबाइलवर टाकलेल्या अपूर्ण मेसेजने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे विकास अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळ गुरुवारी सकाळी १० वाजता उमेदवारांनी गाेंधळ घातला. त्यांना समजावल्यानंतर ते शांत झाले. मात्र, विकास अधिकाऱ्यांच्या या चुकीमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्ह्यात एलअायसी एजंट पदासाठी ३०० जागांची भरती करण्यात येणार हाेती. त्यामुळे एका पदासाठी १० अशा एकूण हजार उमेदवारांना काैशल्य विकास विभागाच्या पाेर्टलवरून माेबाइल क्रमांक घेऊन अाॅक्टाेबर राेजी मेसेज टाकले. त्या मेसेजमध्ये ‘युवर इंटरव्ह्यू शेड्युल्ड अॅट ११ भगीरथ काॅलनी, निअर शिव काॅलनी, एसबीअाय ब्रँच, जळगाव अाॅन १३/१०/२०१६, १०.०० एएम, प्लीज चेक ई-मेल फाॅर माेअर डिटेल्स’ असा अपूर्ण मजकूर हाेता. त्यामुळे ज्या उमेदवारांना मेसेज गेला. त्यांना नेमक्या काेणत्या विभागासाठी मुलाखती हाेणार अाहेत. हे अालेल्या मेसेजवरून समजणे शक्य नव्हते. मात्र, मेसेज महाराष्ट्र शासनाच्या ‘महा.राेज.’ या नावाने अालेला हाेता. त्यामुळे शासकीय मेसेज असल्याने गुरुवारी अनेक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर पाेहाेचले. मात्र, त्यांचा भ्रमनिराश झाला. कारण अनेकांना वाटले हाेते की, मुलाखती स्टेट बँकेच्या काेणत्यातरी पदासाठी हाेणार अाहेत. मात्र, प्रत्यक्षात मुलाखती एलअायसी एजंटच्यापदाकरिता हाेणार असल्याचे समजल्यानंतर अनेकांचा संताप अनावर हाेऊन त्यांनी गाेंधळ घातला. अालेल्या काही उमेदवारांनी एजंटपदासाठी मुलाखती दिल्या.

पुणे,मुंबईहून अाले उमेदवार
एलअायसीनेअनेकांना एसएमएस पाठवले. त्यापैकी सध्या अनेक जण पुणे, मंुबई,नाशिक येथे राहतात. या अपूर्ण एसएमएसमुळे अनेकजण सकाळीच एलअायसीच्या विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ गाेळा झाले हाेते. मात्र, त्यांना पदाबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांचा भ्रमनिराश झाला.
दिशाभूलकरणारा एसएमएस
एलअायसीनेदिशाभूल करणारा एसएमएस टाकला अाहे. त्यामुळे काहीच स्पष्ट हाेत नाही. अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या विषयीचे प्रकरण शेवटच्या टप्प्यात अाहे,असे मनीषा चौधरी हिने सांगितले. तर पुणे येथील विनोद भोई म्हणाला, माझ्या माेबाइलवर अाॅक्टाेबरला एक मेसेज अाला. मात्र, त्यातून काहीच समजत नव्हते. याप्रकरणी एम्प्लाॅयमेंट कार्यालयात फाेन करून विचारले. मात्र, त्यांनाही काही माहित नव्हते. उगाच मनस्ताप सहन करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...