आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साळवे येथील चौघांना जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावात शेतीच्या हिस्सेवाटणीवरून झालेल्या वादातून महिलेला सासरच्या मंडळीने जिवंत ठार केले होते. याप्रकरणी चारही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावात अनिता रामसिंग गिरासे हे दांपत्य दोन मुलांसह वास्तव्यास होते. पती रामसिंग जेठ लोटनसिंग सरदारसिंग गिरासे यांच्यात शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद सुरू होते. १४ ऑगस्ट २०१४ रोजी हिस्सेवाटणीच्या वादातनू जेठ लोटन गिरासे, सासरे सरदारसिंग दौलतसिंग गिरासे, सासू जिसकोर सरदारसिंग गिरासे, सुनंदा लोटनसिंग गिरासे यांनी अनिताच्या घरात घुसून तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत घराबाहेर निघून गेले. या वेळी बाहेरून दरवाजाला कडीही लावून घेतली. जळीत अनितास पती सरदारसिंग गिरासेसह नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या वेळी कार्यकारी दंडाधिका-यांसमक्ष पोलिसांनी तिच्या जबाब घेतला. उपचार सुरू असतानाच अनिताचा मृत्यू झाला. या प्रकरणात कार्यकारी दंडाधिकारी मायानंद भामरे, ठाणे अंमलदार उदेसिंग गिरासे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बापू बडगुजर, गुमानसिंग गिरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटील, डॉ. मोहित मोरे, सहायक पोलिस निरीक्षक आर. जी. माळी, निरीक्षक पी. जी. पोतदार यांच्या साक्षी तपासण्यात आल्या.

आरोपींना जन्मठेपसह दंडही
सत्रन्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी चारही आरोपींना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड दंड भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शासकीय अभियोक्ता बी. बी. बोरसे यांनी काम पाहिले.