आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्टमध्ये स्फोट; महापालिकेत घबराट, ऐन घाईगर्दीच्या वेळेस फ्युज उडाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: स्फोट झाला त्या वेळी काही कर्मचारी नागरिक लिफ्टमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढताना पालिकेचे कर्मचारी.
जळगाव - महापालिकेच्याबेभरवशी लिफ्टचा बुधवारी मनपा आयुक्त, महापौरांसह सर्वच अधिकारी-पदाधिकाऱ्यांना चांगलाच फटका बसला. सकाळी ऐन घाईगर्दीच्या वेळी प्रचंड आवाज होऊन लिफ्ट अचानक बंद पडली. त्यामुळे महापौर,आयुक्तांसह शहरातील सर्वच नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची पालिकेच्या १७ मजली इमारतीच्या पायऱ्या चढून चांगलीच दमछाक झाली.करवाढविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यासाठी नगरसेवक, कार्यकर्त्यांना आंदोलनाआधीच अक्षरश: घाम गाळावा लागला.

सकाळी ११ वाजेची वेळ. महापालिकेत सर्वपक्षीय आंदोलनासाठी पदाधिकारी, नगरसेवकांची लगबग अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यालय गाठण्यासाठी धावपळ सुरू असतानाच पालिकेतील लिफ्टच्या एफएसयू फ्युज युनिटमध्ये जोरदार स्फोट झाला. ऐन घाईगर्दीच्या वेळी झालेल्या या प्रचंड आवाजाने पालिकेत एकच धावपळ उडाली. लिफ्ट बंद पडल्याने महापौर,उपमहापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवक, मनपा आयुक्त,उपायुक्त,कर्मचाऱ्यांची सतरा मजली इमारत चढताना प्रचंड दमछाक झाली. पालिकेचे आयुक्त, उपायुक्तांचे कार्यालय तेराव्या मजल्यावर तर महापौर उपमहापौरांचे दालन हे सगळ्यात उंच म्हणजे सतराव्या मजल्यावर आहे. शहरातील नागरिकांना आपल्या व्यथा प्रत्यक्ष भेटून व्यक्त करण्यासाठी पालिकेत उंच भरारी घ्यावी लागते. यासाठी त्यांना लिफ्ट हाच एकमेव पर्याय असतो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून महत्त्वाची यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. सहापैकी केवळ तीन लिफ्ट सुरू आहेत. त्यादेखील दिवसातून कितीतरी वेळा बंद सुरू होतात. परंतु कंत्राटदारांना त्याचा मेहनताना अदा केला जात नसल्याने दुरुस्तीचे कामही रखडले आहे.याबद्दल नागरिकांनी अनेक वेळा तोंडी तक्रीरीही केल्या. मात्र, तिजोरीत खडखडाट असल्यामुळे पालिकेनेही आतापर्यंत त्याकडे कानाडोळा केला.

एफएसयू फ्युज युनिटमध्ये बिघाड
सकाळी११ च्या सुमारास लिफ्टच्या मेन स्विच पॅनलमध्ये बिघाड झाला. त्याला एफएसयू फ्युज युनिट असे म्हणतात. बिघाड होताच पॅनलमध्ये स्फोटासारखा प्रचंड आवाज झाला. दोन ठिकाणी स्पार्किंग आणि छोटे स्फोट झाले, असे सकृतदर्शनी निदर्शनास आले. या पॅनलला दुरुस्त करण्यासाठी किमान चार तासांचा कालावधी लागणार आहे.त्यासाठी पालिकेचा विद्युत पुरवठा खंडित करावा लागणार असून उद्यापासून दोन दिवस सुटी असल्याने दुरुस्तीचे काम उद्या सुरू करण्यात येणार आहे.

स्फोटासारखा आवाज
पालिकेत ओटीस ह्युंदाई या दोन कंपन्यांच्या लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. या लिफ्टचे पॅनल बराेबर लिफ्टच्या खाली तळमजल्यावर आहे. यात अचानक बिघाड झाला. त्यामुळे जाेरात आवाज झाला. शाॅर्टसर्किटमुळे हा बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. तातडीने निम्मे पॅनल सुरू करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. सध्या आेटीस कंपनीचे ११ लाख तर ह्यंुदाई कंपनीचे लाख ३५ हजार रुपये बिल थकलेले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून दुरुस्ती केली जात नाही. आयुक्तांनी लेखाधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने काही रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

आयुक्त, महापाैरांनी अनुभवला त्रास
सकाळी११ वाजता आयुक्तांच्या दालनात सर्वपक्षीय नगरसेवकांचे आंदाेलन हाेणार हाेते. म्हणून आयुक्त संजय कापडणीस हे बराेबर वेळेवर पाेहचले. साेबत काही नगरसेवक पदाधिकारीदेखील हाेते. परंतु लिफ्ट बंद असल्याने ती तत्काळ दुरुस्त हाेईल, अशी स्थिती नसल्याने थेट १३ व्या मजल्यापर्यंत पायीच प्रवास केला. त्यानंतर आंदाेलनासाठी आलेल्या महापाैर राखी साेनवणे खाविआच्या नगरसेवकांनाही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेकांनी तर पहिल्यांदाच एकाच वेळेस १३ मजले चढण्याचा अनुभव घेतला. त्यामुळे बऱ्याच जणांना दम लागल्याचेही सांगण्यात आले.

चार तासांत दुरुस्ती
लिफ्टदुरुस्तीसाठी संपूर्ण पालिकेचा वीजपुरवठा खंडित करावा लागणार हाेता. त्यामुळे गुरुवारी पालिकेला सुटी असल्याने दुरुस्तीला वेळ लागला तरी अडचण येणार नाही. उद्या सकाळी आठ वाजता कामाला सुरुवात हाेणार असून चार तासांत दुरुस्ती करण्याचे उद्दि्ष्ट आहे. अरुणपाटील, शाखा अभियंता, विद्युत विभाग