आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिफ्ट बंद; अधिकारी ४० मिनिटे अडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या लिफ्टला लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. कधी लिफ्ट खराब झाल्यामुळे तर कधी वीजपुरवठा खंडित हाेण्यामुळे सेवेत अडथळे येत अाहेत. याचा फटका मंगळवारी खुद्द अायुक्तांनाच बसला. वीज गेल्यानंतर जनरेटर तातडीने सुरू झाल्यामुळे अधिकारी नागरिक लिफ्टमध्ये ४० मिनिटे अडकून पडले. या वेळेत अनेकांना मनपाच्या तळमजल्यावर थांबावे लागले. अायुक्तांनाही दुसऱ्या मजल्यावर बसावे लागले. त्यामुळे अायुक्तांनी विद्युत विभागप्रमुखांना नाेटीस बजावली अाहे.
सतरा मजली इमारतीत चाैथ्या मजल्यापासून वरच्या मजल्यावर जायचे म्हटले, म्हणजे लिफ्टशिवाय पर्याय उरत नाही. गेल्या चार महिन्यांपासून सहापैकी एखाद दाेन लिफ्टवर पालिकेचा कारभार सुरू अाहे. कंपनीकडून पैशांची मागणी हाेत असताना पालिका प्रशासन एकेक मागणी पूर्ण करत अाहेत. त्यात सध्या लिफ्टची सेवा सुरळीत असताना मात्र पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार घडत अाहेत.
मंगळवारी सकाळी ११.३० वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अवघ्या १० मिनिटांत लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात अाले. परंतु, त्यानंतरही तब्बल ४० मिनिटांपर्यंत लिफ्ट सुरू हाेऊ शकली नाही. पालिकेची अतितत्काळ सेवा असलेल्या जनरेटरमध्ये अचानक बिघाड झाल्याने ते सुरू करण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात अाले. परंतु, या वेळेत अनेकांना पालिकेच्या तळमजल्यावर थांबावे लागले. अायुक्तांनाही बराचवेळ दुसऱ्या मजल्यावर बसावे लागले.

खुलासा मागवला
जनरेटरसारखी महत्त्वाची यंत्रणा वेळेवर उपयाेगी पडल्यामुळे सतर्क राहिल्याबद्दल विद्युत विभागप्रमुख एस.एस.पाटील यांना कारणे दाखवा नाेटीस बजावून खुलासा मागवला अाहे. ४० मिनिटांपर्यंत लिफ्ट सुरू करण्यास पालिकेच्या यंत्रणेला यश अाल्यामुळे पालिकेची प्रतिमा मलीन हाेत असल्याने अायुक्तांनी ही नाेटीस बजावल्याचे सांगितले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...