आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगीत लिपस्टिक खुलविते महिलांच्या ओठांचे सौंदर्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - लिपस्टिक हा युवतींचा तसा वीक पॉइंट. ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी लिपस्टिक वापरली जाते. या लिपस्टिकमुळे ओठ सुंदर दिसतातच ; परंतु त्यामुळे व्यक्तिमत्त्वही खुलून दिसते. महिलांची मागणी ओळखून बाजारात हजारो कंपन्यांच्या लिपस्टिक विक्रीस आहेत. शेकडो शेड्समध्ये या लिपस्टिक आहेत.
मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी तर खास दालनही उभारण्यात आलेली आहेत. लॅक्मे, ओरिफ्लेम, गार्निअरसारख्या ब्रॅण्डेड कंपन्यांपासून ते लोकल कंपन्यांपर्यंतच्या लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहेत. अ‍ॅलर्जी असणा-या महिलांसाठी खास बनावटीच्या लिपस्टिकही बाजारात आहेत. ओरिफ्लेम व तत्सम बहुराष्ट्रीय कंपन्यांचीही लिपस्टिकची मोठी रेंज बाजारात आहे. युवतींकडून खासकरून लाइट शेडला जास्त मागणी आहे. डार्क शेड केवळ ग्रामीण भागात वापरल्या जातात. लिपस्टिकमध्ये हजारो शेड्स आज उपलब्ध आहेत. अगदी दहा रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत लिपस्टिक विक्रीसाठी आहे. संपूर्ण श्ोड्स असलेल्या लिपस्टिक बॉक्सही महिलांमध्ये लोकप्रिय आहे. यामुळे चॉइसला भरपूर वाव मिळून रोज मॅचिंग लिपस्टिक महिलांकडून लावल्या जातात. अगदी स्वस्त मिळणा-या लिपस्टिक कमी प्रमाणात खरेदी केल्या जातात. कारण त्यामुळे ओठांच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
काही इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रॅण्डेड लिपस्टिक खरेदीकडे महिलांचा जास्त कल दिसून येतो. शक्यतो लॅक्मेच्या लिपस्टिक मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. केवळ लिपस्टिक नव्हे तर त्याच्या पेन्सिलही आज बाजारात आहेत. त्यांनाही चांगली मागणी आहे. नोकरीला जाणा-या महिलांकडून वारंवार नवीन पद्धती, रंग व रेंजची मागणी होत असल्याने मागणी तसा पुरवठा या उद्देशानुसार लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहेत.
शेकडो शेड्स उपलब्ध - आज बाजारात प्रत्येक रंगात अनेक शेड्स उपलब्ध आहेत. महिलांची आवड लक्षात घेऊन रोजच या शेड्समध्ये भर पडत आहे. कधीकधी तर निवडीसाठी शेड कार्डचाही वापर करण्यात येतो. हजारो शेड्स आज बाजारात असल्याने निवडीला मोठा वाव आहे. ब्रॅण्डेड कंपन्यांच्या लिपस्टिक्सना जास्त मागणी युवतींकडून आहे.