आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि गावक-यांचा संयम सुटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्राचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)
चिंचपुरे: पाचोरा येथील दारू, सट्टा व पत्ता बंदी ही नवलाची गोष्ट आहे. या गावातील बहुसंख्य रहिवासी हे शेतकरी व शेतमजूर आहेत. एकेकाळी या गावात शेजारील चार गावातील विद्यार्थी शिकायचे. याच गावात ग्रुप ग्राम पंचायत होती. आजुबाजुच्या खेड्यात व तालुक्यात या गावाचे चांगले नाव होते. पण गावाला दारुचे व्यसन जन्मजातच मिळालेले होते व त्याचा परिणाम हळूहळू जाणवायला लागला होता. गावातील मोठ्या वयस्कर कर्त्यांनी स्वतःला बाजूला करून घेतले. गावातील उच्चशिक्षित मान्यवर गाव सोडून शहरात स्थापित झाले. एकंदरीत गावाला कोणी वाली नव्हता.
दिवसेंदिवस परिस्थिती खालावतच होती. सर्वांनी सर्वांनाच वाऱ्यावर सोडून, ठेविले अनंता तैसेची राहावे जे जे होईल ते ते पाहावे! या उक्तीचा प्रत्यक्षात अनुभव घ्यायचे ठरविले होते. शाळेची दैना पहिली जात नाही. ग्रुप ग्राम पंचायतचे ग्रुप तर कधीचेच गेले. पण पंचायतही कशीबशीच सुरु होती. पण म्हणतात ना “बकरे की मा कब तक खैर मानायेंगी” आणि खरंच चमत्कार घडला. निमित्त होते भागवत सप्ताहाचे.
गावातील धुडगूस घालणाऱ्यांनी त्यांची मनमर्जी केली, आणि गावकऱ्यांचा संयम सुटला. दुसऱ्याच दिवशी सकाळी ग्रामसभा झाली. सर्व गावकऱ्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे गावातील दारू, सट्टा व पत्ता बंदी. यात सिहांचा वाट म्हणजे गावकरी, गावाचे सरपंच व स्त्रिया यांचा आणि खरंच नवलच झाले. गावातील दारू, सट्टा व पत्ता बंदी या गोष्टी सर्वांच्या मनात खलत होत्या. पण पुढाकार कोण घेईल. तीच गोष्ट गावाने करून दाखविली. म्हणून म्हणतात, गाव करील ते राव काय करील. संपूर्ण गावाचे या निर्णयाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि ही बंदी कायम ठेवावी या शुभेच्छा.