आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवसात 158 परवान्यांचे नूतनीकरण; दारूची दुकाने सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका हद्दितील १५८ मद्यविक्रीच्या परवान्यांचे नूतनीकरण केले. यापैकी काही दुकाने बुधवारीच सुरू करण्यात आली आहेत. 
 
जिल्ह्यात ७४९ मद्य विक्रीची दुकाने आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेली ५६० मद्यविक्रीची दुकाने बंद केली होती. त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे केले नव्हते. आता न्यायालयाने महानगरपालिका, नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातील ज्यांचे सन २०१७-१८ दरम्यान रद्द झालेल्या मद्यविक्रीच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अाता ५६० मद्य विक्रीच्या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार आहे. त्यापैकी बुधवारी जळगाव पालिका हद्दितील ५५, नगरपालिका हद्दितील १०३ परवान्यांचे नूतनीकरण केले. 
बातम्या आणखी आहेत...