आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थितीवर मात करणारे खरेखुरे 'लिटल चॅम्प्स' रविवारी जळगावात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: प्रयास-सेवांकूर या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि.22) दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान येथील बालगंधर्व खुले नाट्यगृहात 'खरेखुरे लिटल चॅम्प्स- जीवनाशी लढणार्‍या करखर मुलांची गोष्ट' या अतिशय आगळ्या वेगळ्या व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
असामान्य बुद्धीमत्ता, धडधाकट्यांना लाजविणारे कौशल्य आणि हलाखीच्या परिस्थितीतही जगण्याशी लढण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारे उत्तुंग यशाच्या मुद्रेवर अल्पवयातच आपले नाव कोरणारे चेतन, कांचनमाला, पाणेरी, राणी आणि सुयश ही अतिशय प्रतिभावान मुले जळगावकरांच्या भेटीला येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी हे या बच्चे कंपनीला घेऊन येणार आहेत. रविवारी होणार्‍या या कार्यक्रमात ते स्वत: मुलाशी संवाद साधतील, त्यांना बोलतं करतील. ही मुलं आपल्या कणखर जगण्याची कहाणी जळगावकरांसमोर मांडतील. यासोबत परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन, व्यक्तिमत्व विकासाची धडे ते विद्यार्थ्यांना देणार आहेत. संवाद, मार्गदर्शन, शिक्षण, प्रशिक्षण, गीत, धम्माल असा सर्वांगसुंदर कार्यक्रमासाठी केवळ 10 रुपये देणगी शुल्क असून प्रवेशिकासाठी 9423617405, 9960375424, 9860948258 या क्रमाकांवर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेशिका घेऊन येणार्‍यास 60 प्रेरणा गीतांची रु.10 किंमतीची पुस्तिका सस्नेह भेट देण्यात येणार आहे.