आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० तासांतच वाढला ५.३५ टक्के जलसाठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - हतनूर धरणात रविवारी सकाळी वाजता २२.५५ टक्के जलसाठा होता. मात्र, मध्य प्रदेश आणि वदिर्भात समाधानकारक पाऊस झाल्याने सायंकाळी वाजता २७.०९ टक्के जलसाठा होता. १० तासांत दरवाजांतून विसर्ग होऊनही तब्बल ५.३५ टक्के जलसाठा वाढला आहे.

धरणाचे आठही दरवाजे रविवारी पूर्ण उघडून ८११.०० क्युमेक्स प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला तर धरणात २१०.१७० मीटर जलपातळी २०२. १० दशलक्ष घनमीटर जलसाठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा कमी असला, तरी समाधानकारक आहे. मध्य प्रदेश आणि वदिर्भात होत असलेल्या पावसामुळे धरणाची जलपातळी निरंतर वाढत आहे. आठ दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग होत असला तरी धरणात समाधानकारक पातळी वाढत आहे. सकाळी २२.५५ टक्के जलसाठा होता तर सायंकाळी २७.०९ टक्के जलसाठा झाला. हतनूर धरणाच्या ऐरडी, गोपाळखेडा, चिखलदरा, बऱ्हाणपूर, लखपुरी, टेक्सा येथेही समाधानकारक पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हतनूर धरणाच्या परिसरात पाऊस नसला तरी पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याचा फायदा हतनूर धरणाला होत आहे. त्यामुळे समाधानकारक स्थिती आहे.