आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदारांना वादग्रस्त एसएमएस पाठवल्याने चाैकशी : पोलिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/धुळे- अशाेक सादरे आत्महत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी मी लढत आहे. त्यामुळेच संशयित आराेपींना पाठीशी घालणाऱ्या त्यांच्या ‘गॉडफादर’ व्यक्तींकडून त्रास दिला जात असून विविध प्रकरणांमध्येही मला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी मािहती माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुळे शहराचे अामदार अनिल गाेटे यांना वादग्रस्त एसएमएस पाठविल्याबद्दल त्यांच्या ताेंडी तक्रारीवरून गुप्ता यांची चाैकशी केल्याचे धुळे पाेलिसांनी सांगितले.
गुप्ता यांना गुरुवारी धुळे येथील आझादनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी काहीही पूर्वसूचना देता चौकशीसाठी धुळ्याला नेले होते. त्या पार्श्वभूमीवर गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले गुरुवारी दुपारी ११.३० ते १२.३० वाजेदरम्यान माझ्या मोबाइलवरून एका विशिष्ट सिम क्रमांकाने धुळे, नंदुरबार, साक्री येथील काही प्रतिष्ठित लोकांना अश्लील एसएमएस पाठवण्यात अाले होते. त्या क्रमांकाची तोंडी तक्रार आझादनगर ठाण्यात कुणीतरी केली अाहे.
पोलिसांनी तासांत ते एसएमएस माझाच्या मोबाइल (अायएमईअाय क्रमांक)वरून आल्याचा शोध लावला मला तत्काळ धुळ्याला घेऊन गेले. तेथे पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव यांनी चौकशी केली. पाेलिसांनी मला माझ्या मोबाइलचा अायएमईअाय क्रमांकाच्या मोबाइलचा वापर झाल्याचे या वेळी सांगितले. त्या वेळी मी ‘तो’ संशयित क्रमांक आपला क्रमांक वेगवेगळा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आणून दिले. परंतु, तरीही पाेलिसांनी आयएमईआय क्रमांकाच्या शेवटचा अंक हा ते असला तरी तो शून्यच मानला जातो, अशी खोटी माहिती मला िदली. सध्या माझा मोबाइल, दोन सिम कार्ड मेमरी कार्ड पोलिसांच्या ताब्यात आहे.
त्यात काही फेरफार हाेण्याचा मला संशय अाहे. चाैकशी दरम्यान डीवायएसपी जाधव यांनी मला तुम्ही बाहेर लोकांना हा प्रकार सांगता धुळे येथील लामकणी गावात झालेल्या दरोड्याच्या तपासाबाबत चाैकशी केल्याचे सांगा, असे सांगितले. याप्रकरणी मी धुळे येथील पोलिस अधीक्षक, डीवायएसपी जाधव आझादनगरचे पोलिस निरीक्षक यांच्याविरोधात आपण उच्च न्यायालय तसेच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार आहे, असेही ते म्हणाले.

धुळे अामदार अनिल गाेटे यांना एका नंबरवरून वादग्रस्त एसएमएस अाला हाेता. त्याबाबत त्यांनी पाेलिसांकडे तोंडी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या नंबरची माहिती संबंधित कंपनीकडून घेण्यात अाली. त्यानुसार तपासातून हा माेबाइल क्रमांक जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना चाैकशीसाठी अाणले गेले हाेते. मात्र, त्याबाबत लेखी स्वरूपात तक्रार नसल्याने त्यांची चाैकशी करून त्यांना साेडून देण्यात अाल्याचे आझादनगर पोलिसांनी सांगितले.