आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी घटली तरी भारनियमन ‘जैसे-थे’; शहरात सहा तर ग्रामीण भागात अाठ तास सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वातावरणात वाढलेला गारवा अन् त्याला मिळालेली पावसाची साथ, अशा स्थितीत विजेची मागणी कमी झाली असतानाही भारनियमन जैसे-थेच असल्याची स्थिती आहे. सद्य:स्थितीत फीडरनिहाय भारनियमनाचा दावा केला जात असला तरी, अजूनही शहरासह ग्रामीण भागातही सहा ते आठ तासांचे भारनियमन सुरूच आहे.

राज्यात वीज मागणीच्या तुलनेत जाणवणाऱ्या तुटवड्यामुळे भारनियमन अटळ बनले आहे. गेल्या आठवड्यापासून वातावरणात गारवा निर्माण झाला असून विजेच्या मागणीत १० टक्क्यांनी घट झाली आहे. साधारणत: जुलैपासून भारनियमनात घट होत असते. वीजभार केंद्राकडील उपलब्ध विजेनुसार भारनियमन ठरवले जाते. ऑक्टोबर हीटमुळे वाढलेली विजेची मागणी नोव्हेंबरच्या मध्यंतरास कमी झाली आहे. महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राज्यात विजेची मागणी १४ हजार ४०२ मेगावॅट होती, तर पुरवठा हा १३ हजार ९४५ इतका झाला. ४५७ मेगावॅटची तूट होती. ही तूट रविवारी मात्र कमी झालेली दिसली. मागणी १४ हजार ०८५ मेगावॅट तर उपलब्ध वीज १३ हजार ९६१ मेगावॅट होती तर तूट १२४ मेगावॅटची होती. हळूहळू विजेची तूट कमी होत असतानाही भारनियमनात मात्र अपेक्षित घट होत नसल्याची स्थिती आहे.
ग्रुपनिहाय भारनियमन : महावितरणचा दावा
बहुतांश ग्रामीण भागात रात्रीचेही भारनियमन सुरू आहे. यामुळे वीज ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचवेळी ग्रुपनिहाय भारनियमन केले जात असल्याचा दावा महावितरण कंपनी करीत आहे.