आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडिया बंद; भारनियमन सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नवरात्रोत्सव संपताच सोमवारपासून शहरात भारनियमन सुरू झाले. खंडित वीजपुरवठा सुरू करण्याचा शब्द न पाळण्यात पटाईत असलेल्या महावितरणने भारनियमन मात्र पुन्हा सुरू करण्याचा शब्द पाळला.

महावितरण कंपनीने सणांच्या काळात भारनियमन रद्द करण्याचे पत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांचा विनाभारनियमनाचा कार्यक्रमही कंपनीने जाहीर केला होता. मात्र, असे असतानाही या दिवसात अनेकदा ग्राहकांना खंडित वीजपुरवठय़ाला सामोरे जावे लागले. सोमवारी दुर्गा उत्सवाची सांगता होणार असल्यावरही यादिवशी तीन ते चार तासांचे भारनियमन करण्यात आले. दरम्यान, बुधवारी असलेल्या बकरी ईदनिमित्त भारनियमनाबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे महावितरणने सांगितले.