आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम केवळ 3 तासांचा; पण वीजभारनियमन हाेतेय 6 तास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - शहरात‘ए’ ते ‘डी’ झाेनमध्ये नियमानुसार भारनियमन किमान फक्त तीन तासांचे हवे असताना मात्र ते सहा ते सात तासांचे होत आहे. त्यामुळे या भागातील लघुव्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. शहराचा ६० टक्के भाग हा ‘ए’ ते ‘डी’ झाेनमध्ये येताे. याशिवाय भारनियमनाची वेळ फिरत्या वेळेनुसार ठेवता प्रत्येक भागात सुरुवातीपासून तीच वेळ अाहे. 
 
चाळीसगाव शहरात झाेननुसार वीज जाेडणी करण्यात अाली असून ते एफ असे सहा तसेच जी १, जी २, जी असे एकूण नऊ झाेन अाहेत. वीज बिलाची थकबाकी नियमित भरणे, वीजचाेरीला अाळा घालणे हे दाेन गुण मिळवले तर त्या भागातील झाेन ते डी यामध्ये माेडले जातात. त्यामुळे या भागात खूप अावश्यक असेल तरच भारनियमन करण्याचा नियम अाहे. भारनियमनाची वेेळ अाली तर किमान फक्त अडीच ते तीन तासांचे भारनियमन या भागात करता येते. परंतु, वीज कंपनीने ते डी झाेनमध्ये देख‌ील इतर झाेनप्रमाणे सात तासांचे भारनियमन सुरुच ठेवले अाहे. त्यामुळे ७० टक्के शहरी भागात असंताेष पसरला अाहे. 
 
वेळत बिल भरत असतानाही त्रास 
धुळे राेड,अादर्शनगर भागात सात तासांचे भारनियमन अन्यायकारक अाहे. अाम्ही वेळेतवीज बिल भरत असताना देखील भारनियमनाचा जाच सहन करावा लागताेय. - कविता देशमुख, गृहिणी 
 
विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षाणिक नुकसान 
सहातेसात तासांचे भारनियमन सुरू झाल्याने एेन सहामाही परीक्षेच्या कालावधीत मुलांना अभ्यास करता येत नाही. भारनियमनास विराेध नाही, परंतु, पहाटे रात्रीचे भारनियमन टाळावे.
- राजू पवार, शेतकरी 
 
नगरसेवकांचे निवेदन 
नगरसेविकागिताबाई भगवान पाटील, त्यांचे पती भगवान पाटील यांनी जुन्या वेळापत्रकानुसार मालेगावराेड, धुळेराेड भागात भारनियमन हाेत असल्याचे पत्र कार्यकारी अभियंता साेनवणे यांना दाेन दिवसांपूर्वीच दिले. बिले वाटप करणे, बिले उशिराने देणे ,असे प्रकार घडत असल्याने थकबाकीचा अाकडा फुगत असल्याचे भगवान पाटील यांनी सांगितले. वास्तविक हा भाग डी झाेनमध्ये असतानाही सात तासांचे भारनियमन सुरू अाहे. हे भारनियमन कमी करावे. अन्यथा दि.१८ पासून अामरण उपाेषणाचा इशारा दिला आहे. 
 

नवीन प्रस्ताव तयार करणार 
काहीभागात जुन्या थकबाकीनुसार जास्तीचे भारनियमन सुरू अाहे. थकबाकी वीजगळतीचे प्रमाण तपासून त्या-त्या झाेनमध्ये किती भारनियमन हवे, याबाबत वेळापत्रक बनवण्यात येत अाहे. त्यानुसार भारनियमन कमी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येईल. धुळेराेड, मालेगावराेड भागात थकबाकी वाढल्याने हा भाग अाता एफ झाेनमध्ये गेल्याने तेथे भारनियमन वाढले अाहे. 
- एन.के. साेनवणे, कार्यकारी अभियंता 
 
बातम्या आणखी आहेत...