आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असह्य उकाडा; लोडशेडिंगने पळवले पाणी; उद्योगांनाही फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अाॅक्टाेबर हिट अन् तासंतास हाेणाऱ्या भारनियमनामुळे जळगावकर प्रंचड हैराण झाले अाहे. तर दुसरीकडे पुरेसा जलसाठा असूनही जळगावकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामाेरे जावे लागत अाहे. एेन दिवाळीच्या ताेंडावर भारनियमनाने शहरवासीयांच्या हक्काचे पाणी पळवले अाहे.
 
पालिकेकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने विद्युत पंपाचा वापर करावा लागताे; पण भारनियमन सुरू झाल्यानेे नळांना पाणीच येत नसल्याची स्थिती अाहे. तसेच भारनियमनामुळे एमआयडीसीमधील उद्योगांना मोठा फटका बसला आहे. 
 
शहरात सध्या महावितरण वीज कंपनीकडून भारनियमन सुरू झाले अाहे. दिवसाला तीन ते सहा तासापर्यंत भारनियमन केले जात असल्याने अाॅक्टाेबर हिटच्या तडाख्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले अाहे. हा त्रास सहन करत असताना अाता दाेन दिवसाअाड हाेणाऱ्या पाणीपुरवठा दरम्यान भारनियमानाचा माेठा फटका जळगावकरांना साेसावा लागताेय. पालिकेकडून पहाटे वाजेपासून शहरात नियाेजनानुसार पाणीपुरवठा केला जाताे. परंतु विद्युत विभागाकडून सकाळी वाजेपासून भारनियमनाला सुरुवात केली जात अाहे. त्यामुळे ज्या भागात सकाळी ते सायंकाळी वाजेदरम्यान भारनियमनाच्या काळात पाणीपुरवठा झाला त्या नागरिकांना पाण्यासाठी खूप कसरत करावी लागते. तसेच पालिकेकडून कमी दाबाने पुरवठा केला जात असल्याने नळांना विद्युत पंपांशिवाय पाणी येत नसल्याची माेठी समस्या निर्माण झाली अाहे. 
 
नगरसेवकांकडे तक्रारी 
गुरुवारी भिकमचंद जैननगरातील नागरिकांना भारनियमनाच्या काळात पाणीपुरवठा झाल्याने संताप व्यक्त करण्यात अाला. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत अाहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाण्याचे जार विकत घेण्याची वेळ नागरिकांवर अाली अाहे. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवक संदेश भाेईटे यांना संपर्क करून व्यथा मांडली. 
 
लाेकप्रतिनिधीचे दुर्लक्ष का? 
भारनियमनाचा दैनंदिन जॉब वर्क करणाऱ्या उद्योग व्यावसायिकांना फटका बसला आहे. एकीकडे स्टार्टअप, स्टॅन्डअप सारख्या योजना सरकार आणत आहे. त्याच्या वारेमाप जाहिराती करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे उद्योगांवर भारनियमन लादले जातेय. अशा परिस्थितीत उद्योग कसे करणार हा माेठा प्रश्न आहे. या प्रश्नाकडे पालकमंत्री, खासदार आमदार लक्ष का देत नाहीत? हे एक काेडेच आहे. 
- श्रीधर इनामदार, अध्यक्ष, सॅटर्डे क्लब  

एमअायडीसीतील माेठ्या उद्याेगांना भारनियमनाचा फटका बसत नसला तरी शहरातील जिल्ह्यातील हजाराे लहान उद्याेग अडचणीत येणार अाहेत. पैकी तास वीज बंद म्हटल्यावर काम कसे पूर्ण हाेणार त्यात कामगारांचे वेतनाचा प्रश्न अाहेच. हे सर्व काेळशाच्या टंचाईमुळे हाेत असल्याचे सांगितले जात अाहे. यावरून प्रशासन शासनाचा नियाेजन शून्य कारभार लक्षात येताे. 
- किरण राणे, उपाध्यक्ष, जिंदा संघटना 
बातम्या आणखी आहेत...