आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापाैर, सभापतीपदासाठी लाॅबिंग; दाेन्ही पदांसाठी प्रत्येकी तीन चेहरे चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापाैर पदासाठी ललित काेल्हे यांचे नाव निश्चित असल्याने ही स्पर्धा सुरू हाेण्यापूर्वीच संपली अाहे. त्यामुळे रिक्त हाेणाऱ्या उपमहापाैर महिनाभराने हाेणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदांच्या निवडीकडे नजरा वळल्या अाहेत. लेवा समाजाला प्रथम नागरिकाची संधी मिळाल्यामुळे शहराच्या मतदानाचा महत्वाचा वाटा असलेल्या मराठा काेळी समाजाला या दाेन्ही पदांवर संधी मिळू शकते. त्यामुळे नेत्यांनी असा विचार केल्यास सध्या तरी दाेन्ही पदांसाठी प्रत्येकी तीन चेहरे चर्चेत अाले अाहेत. 

दाेन दिवसांपूर्वीच नितीन लढ्ढा यांनी महापाैरपदाचा राजीनामा दिल्याने शहराचे राजकारण ढवळून निघाले अाहे. राजकारणात नेहमीच जातीय समीकरणांना महत्व देण्यात येते. त्यात पुढच्या वर्षी निवडणूक असल्याने त्याला यंदा अधिक महत्व प्राप्त झाले अाहे. दीड वर्षांत काेळी समाजाला काेणतेही पद दिले नसल्याने अागामी काळात उपमहापाैरपदावर काेळी समाजाला संधी मिळू शकते. त्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक गणेश साेनवणे, दत्तू काेळी, शामकांत साेनवणे, भारती साेनवणे यांच्या नावाची चर्चा अाहे. त्यातही भारती साेनवणे यांना यापूर्वी संधी मिळाली अाहे. तसेच शामकांत साेनवणे यांच्या घरात याच पंचवार्षिकमध्ये महापौरपदाची संधी दिली अाहे. त्यामुळे उर्वरित दाेघांमध्ये कुणाला संधी मिळते की अाणखी तिसरा पर्याय शाेधला जाताे, याबाबत उत्सुकता अाहे.

सभापतिपदी मराठा उमेदवार शक्य 
स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांचा एक वर्षाचा कार्यकाळ ३० सप्टेंबर राेजी संपणार अाहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीचे वेध अातापासून लागले अाहेत. अागामी सभापती मराठा समाजाचा असेल असा तर्क लावला जात अाहे. यासाठी ज्याेती इंगळे, संदेश भाेईटे, अजय पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू अाहे. नगरसेविका इंगळे यांना पुन्हा स्थायी समितीत संधी मिळाली तर त्यांनाही सभापतिपदाची संधी मिळू शकते. अन्यथा स्पर्धा अजय पाटील संदेश भाेईटे या दाेघांमध्ये राहणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...