आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Government Institutions, Latest News In Divya Marathi

पोटनिवडणुकीमुळे मतदारांना ‘अच्छे दिन..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सर्वाधिक महागडी निवडणूक म्हणून परिचित असलेल्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मनीष जैन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेमुळे मतदारांना विधान परिषदेसाठी दोन वेळा मतदानाची संधी मिळणार आहे. पोटनिवडणुकीमुळे चालून आलेले ‘अच्छे दिन’ मतदारांचे भाव वाढवणारे ठरणार आहेत.
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 11 जुलैला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, महापालिका, पालिकांचे नगरसेवक या निवडणुकीसाठी मतदान करू शकतील. या मतदारसंघासाठी मतदार असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका 2012मध्ये झाल्या. याच काळात नगरपालिकांच्याही निवडणुका झाल्या. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असल्याचे त्यांची मुदत 2017मध्ये संपणार आहे. विधान परिषदेची निवडणूक 2010मध्ये झाली आहे. या निवडणुकीचा सहा वर्षांचा कार्यकाळ 2016मध्ये संपणार आहे. त्यामुळे येत्या 11 जुलै रोजीची पोटनिवडणूक आणि त्यानंतर 2016मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठीही हेच मतदार मतदान करू शकतील. मोठय़ा प्रमाणावर अर्थकारण क्रियाशील होत असल्याने या मतदारांची दुसर्‍यांदा चांदी होणार असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू झाली आहे.