आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divay Marathi

निवडणुकीवर मोबाइल स्कॉडची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूक आयोगाने मोबाइल स्कॉड तयार केले आहे. ते स्कॉड आचारसंहिता उल्लंघन, आर्थिक गैरप्रकारांवर नजर ठेवणार आहे. दरम्यान, अन्य प्रशासकीय कामकाजाचा बुधवारी जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी बुधवारी सायंकाळी प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन आचारसंहितेचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह अन्य अधिकार्‍यांशी चर्चा केली. उमेदवार, कार्यकर्त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी मोबाइल स्कॉड लक्ष ठेवणार असून ते कोणत्याही क्षणी सरप्राइज व्हिजीट करून कारवाई करेल. यात एक एक्झिक्युटिव्ह मॅजिस्टेड दर्जाची व्यक्ती, 1 पोलिस अधिकारी, 3 कर्मचारी आणि 1 कॅमेरामन असेल.
सुमारे 6 हजार कर्मचार्‍यांची आवश्यकता
निवडणुकीसाठी पोलिस प्रशासनाला सुमारे 6 हजार कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. यात 1900 होमगार्ड उपलब्ध होणार आहेत. तर 3000 पोलिस कर्मचारी आहेत. उर्वरित 1600 कर्मचारी बाहेरून मागवण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी एक याप्रमाणे उपअधीक्षक आणि सीआरपीएफच्या सहा तुकड्यांची मागणी करण्यात आली आहे.
शस्त्र जप्त करण्यासाठी कारवाई लवकरच
जिल्ह्यात 1500 परवानाधारकांकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत. यापैकी 300 शस्त्रे कायमसाठी जमा करण्यात आली आहेत. तर उर्वरित शस्त्र जप्त करण्यासाठी कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या तयारीसाठी आज बैठका
निवडणुकीच्या तयारीसाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्व शासकीय विभागांचे अधिकारी आणि दुपारी 3 वाजता नोडल अधिकारी, सायंकाळी 5 वाजता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत जिल्हाधिकार्‍यांनी बैठक आयोजित केली आहे. दरम्यान, मतदारांसाठी रविवारी विशेष नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे.