आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

गुलाबराव देवकरांऐवजी कोण ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे आमदार गुलाबराव देवकर तुरूंगात असल्याने त्यांच्यावतीने अथवा त्यांच्या ऐवजी जनतेशी संवाद साधणारा कोणीच नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. देवकर परिवारातील कोणीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात फिरत नसल्याने येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत देवकरांना जामीन न मिळाल्यास या मतदारसंघात राष्ट्रवादीला पर्याय शोधावा लागेल.
घरकुल घोटाळ्यात जामीन रद्द झाल्यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव देवकर हे तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत. जामिनावर असताना मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य नागरिकांशी देवकरांचा थेट संबंध होता. परंतु तीन महिन्यातील परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. राष्ट्रवादीचे संघटनात्मक कार्य सुरू असले तरी धरणगाव व जळगाव तालुकयात मतदारसंघ विभागला गेला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करेल असे नेतृत्व सद्या मतदारसंघात नसून देवकरांच्या कुटुंबातील कोणीही तसा प्रयत्‍न करताना दिसत नाही. जिल्हा परिषद सदस्य असलेले गोपाळ देवकर हे न्यायालयीन कामात गुंतलेले असून पुत्र विशाल सद्या धुळे मुक्कामी असल्याचे सांगितले जात आहे.
एकही चेहरा पुढे येईना
गुलाबराव देवकर हे जळगाव लोकसभा निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाल्यानंतर विधानसभेसाठी कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावेळी विशाल किंवा गोपाळ देवकर यांची नावे समोर आणली जात होती. मात्र, गुलाबराव देवकरांना अटक झाल्यानंतर या दोघांनीही जनसंपर्कच तोडून टाकला आहे. त्यामुळे जर विधानसभा निवडणुकीपूर्वी देवकरांना जामीन मिळाला नाही तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना भेडसावतो आहे.