आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Badoda Dhule Bus, Police, Divya Marathi

बडोदा-धुळे बसमधून 28 लाख रुपये जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्री - तालुक्यातील कोंडाईबारी घाटात बडोद्याहून येणार्‍या बसमध्ये निवडणूक सर्वेक्षण पथकाला 28 लाख रुपये मिळाले. ही रक्कम नेणार्‍या व्यक्तीस पथकाने ताब्यात घेतले असून, सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे.
कोंडाईबारी घाटात बडोदा-धुळे या बसची (क्र. एमएच-40/एन-9086) तपासणी केली. त्या वेळी चाळीसगाव येथील सुनील लक्ष्मण कोठावदे (वय 43) यांच्या बॅगेची पथकाने तपासणी केली. त्यात 28 लाख 84 हजार 726 रुपये सापडले. या रकमेसंदर्भात कोठावदे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
व्यापारी साक्रीत धडकले
कोठावदेंना निवडणूक पथकाने ताब्यात घेतल्यानंतर चाळीसगावच्या व्यापार्‍यांनी येथील तहसील कार्यालयात धाव घेतली. 10-12 व्यापार्‍यांनी संयुक्तपणे ही रक्कम पाठवल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे होते.