आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Election Commission, Divya Marathi

भुसावळात आल्या आयोगाच्या 2 लाख 62 हजार वोटर स्लिप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ मतदार संघात वाटपासाठी 2 लाख 62 हजार 441 वोटर स्लिप प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक अयोगामार्फत प्राप्त वोटर स्लिपचे बीएलओंमार्फत वाटप होईल.
मतदान केंद्र कुठे, त्याचा क्रमांक काय? याबाबत माहिती मिळावी, यासाठी राजकीय पक्षातर्फे मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना चिठ्ठय़ा दिल्या जातात. मतदाराचे नाव, मतदान यादीतील क्रमांक, मतदान केंद्राचे नाव आणि क्रमांक, असा तपशील या स्लिपमध्ये आहे. जळगाव येथून भुसावळ मतदार संघाच्या स्लिप सोमवारी तहसील कार्यालयात प्राप्त झाल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर कार्यरत बीएलओंमार्फत या चिठ्ठय़ांचे वाटप होणार आहे. यासाठी बीएलओंची मंगळवारी सकाळी 10 वाजता आढावा आणि मार्गदर्शन बैठक होईल. भुसावळ मतदार संघातील 248 बीएलओंकडे वोटर स्लिप वाटपाची जबाबदारी राहणार असून मुख्य निवडणूक निरीक्षक मार्गदर्शन करतील.


महत्त्वाचे मुद्दे असे
ज्या मतदारांकडे आयोगाची वोटर स्लिप असेल, त्यांना ओळखीचा इतर कोणताही पुरावा अथवा ओळखपत्र दाखवण्याची गरज भासणार नाही. स्लिपवर बीएलओंची स्वाक्षरी असेल.


आयोगाच्या सूचनेनुसार काम
नवीन मतदारांना लवकरच ओळखपत्र मिळतील. मंगळवारी मुख्य निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत आढावा, मार्गदर्शन बैठक होणार आहे. विजयकुमार भांगरे, सहायक अधिकारी, भुसावळ