आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Fraud Of Expenditure, Divya Marathi

खर्चाबाबत फसवणूक टाळण्यासाठी दरपत्रक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चाची र्मयादा 70 लाखांपर्यंत केली आहे. त्यासोबत खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. उमेदवाराकडून कोणत्या गोष्टींवर खर्च केला जाऊ शकतो, याचा अंदाज बांधून त्यांचे स्टॅँडर्ड दरच आयोगाने जाहीर केले आहेत.


उमेदवाराकडून महागाईच्या जमान्यातही प्रत्येक गोष्टीचा खर्च अत्यल्प दाखविला जातो. एक रुपयाला चहा आणि 10 रुपयांची झुनका भाकर दाखवून आयोगाची दिशाभूल केली जाते. या वेळी मात्र आयोगाने बाजारपेठेतील प्रचारात लागणार्‍या वस्तूंचे दरपत्रकच मागवून ठेवले आहे. उमेदवाराचा खर्च त्या दरपत्रकाप्रमाणे आकारला जाईल. निवडणुकीत प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या यंत्रणेवर काय खर्च होऊ शकतो, यावर आयोगाने दरसूची जाहीर केली आहे. यात वाहनांच्या प्रकारानुसार त्यांना दिवसभर लागू शकणारे इंधन, त्यांचे भाडे, फटाक्यांचा खर्च, चहापानी, नाश्ता, जेवण यांचा खर्च गृहीत धरला आहे. उमेदवाराकडून सादर केल्या जाणार्‍या खर्चाची पडताळणी करण्यासाठी विशेष यंत्रणादेखील निवडणूक आयोगाने नियुक्त केली आहे. आयोगाच्या दरसूचीनुसार वाहनांच्या 24 तासांचे भाडे प्रकारानुसार निश्चित करण्यात आले आहेत. पाण्याच्या बाटलीचा दर 15 ते 20 रुपये, जेवणाची थाळी 60 ते 180 रुपये, नाश्ता 15 ते 50 रुपये, चहा, कॉफी 6 ते 10 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय
70 लाखांपर्यंत खर्चाची म र्यादा; खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतली जाणार विशेष काळजी
सभांचा खर्च


1500 ते 1800 रुपये कार

1500 ते 1800
रुपये सुमो, क्वॉलिस

300 ते 500
रुपये तीनचाकी वाहने

1200 ते 1500