आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Liquor, Bar Owner, Divya Marathi, Jalgaon

तळीरामांची चंगळ: एकाच महिन्यात रिचवले 3 लाख लिटर विदेशी मद्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - निवडणूक कोणतीही असो; तिच्यात मद्य वाटप आलीच, मग लोकसभा निवडणूक त्यातून कशी सुटणार.. त्यामुळे सध्या मद्य पिणार्‍यांची चांगलीच चंगळ सुरू आहे. सायंकाळ होताच शहरातील तसेच महामार्गावरील धाबे फुल्ल होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. मार्च 2013 मध्ये 2 लाख 86 हजार 289 लिटर तर मार्च 2014 मध्ये 3 लाख 31 हजार 059 लिटर विदेशी मद्य विक्री झाली. म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा मार्च महिन्यात 44770 लिटर (19.5 टक्के) मद्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. मात्र देशीदारूकडे तळीरामांनी पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीपेक्षा 1.79 टक्के देशीदारूची विक्रीत घट झाली आहे.
बारमालकही झाले ‘हायटेक’
निवडणुकीमुळे बिअरबार मालक, वाइन शॉप मालक, देशी दुकानदारांना रोज किती मद्यची विक्री केली याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला ईमेलने द्यावी लागत आहे. आचारसंहिते पूर्वी विक्रेत्यांनी ही माहिती दररोज सायंकाळी कागदांवर लिहून जमा करावी लागत होती.
50 टक्क्यांपेक्षा जास्त विक्रीची चौकशी
ज्या हॉटेलमध्ये गेल्या वर्षीच्या चालू महिन्यापेक्षा 50 टक्क्यांनी विक्री जास्त झाली असेल. एकाच व्यक्तीला जास्त प्रमाणात मद्य विक्री केली असेल. अशा हॉटेल चालक, वाइन शॉपमालकांची चौकशी करून कारवाई केली जात आहे. 2 एप्रिलला एरंडोल जवळील दोन हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
अडीच लाखांची मद्य जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठ दिवसांत भुसावळ विभागात 2, जळगाव विभागात 2, चाळीसगाव विभागात 2 आणि भरारी पथकाने 1 अशा एकूण 7 ठिकाणी केलेल्या कारवाईत अडीच लाख रुपयांची गावठी दारू पकडून नष्ट केली आहे. गिरणा आणि वाघूर नदीच्या काठावर या दारूच्या भट्टय़ा होत्या.
आचारसंहिता संपेपर्यंत हिशेब
आचारसंहितेपर्यंत दारूच्या खरेदी-विक्रीचा अहवाल रोजच आम्हाला दिला जातो. मार्च 2013 मध्ये किती विक्री होती आता किती आहे. यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री आढळल्यास तसा अहवाल पाठवावा लागेल. ना.ना.पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.
देशीदारूच्या विक्रीत घट
सध्या देशीदारूच्या विक्रीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. उलट गेल्या महिन्यापेक्षा विक्रीत काही प्रमाणात घट झाली आहे. दिलीप शेवाळे, देशीदारू विक्रेता
सभा असली की वाढते गर्दी
निवडणुकीसाठी सध्या सभा होत आहेत. शहरात एखादी सभा झाली की, त्या दिवशी हमखास गर्दी वाढते. दिवसभर प्रचार केल्यानंतर कार्यकर्ते हायवेवरील ढाब्यांवर गर्दी करतात. त्यामुळे सध्या व्यवसायात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ललित पाटील, जळगाव जिल्हा रिटेल वाइन असोसिएशन