आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष न करण्याचे भाजप नेत्यांचे अभिवचन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-गेल्या पाच वर्षांत खासदार निधीच्या वाटपात शिवसेनेकडे दुर्लक्ष झाल्याची खंत भाजपचे आमदार गिरीश महाजन व उमेदवार ए.टी. पाटील यांनी व्यक्त केली. चूक दुरुस्त करत कोणावर अन्याय होणार नाही, असे अभिवचन दिले. पहिल्यांदाच शिवसेनेचा जिल्हा मेळावा शुक्रवारी लाडवंजारी मंगल कार्यालयात पार पडला. प्रचार कामात शिवसैनिकांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासंदर्भात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपनेते गुलाबराव पाटील यांनी देशात परिवर्तनाची लाट आहे. संधी चालूून आली आहे. संधीचे सोने करायची वेळ आल्याचे सांगितले. आमदार गिरीश महाजन यांनी आगामी काळात खासदार निधीचा वापर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या मतदारसंघातही करण्याचे आश्वासन दिले.