आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लोकसंघर्ष मोर्चा’चे प्रांत कार्यालयासमोर धरणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पाल वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी रावेर तालुक्यातील निमड्या येथील वनहक्कदावे दाखल केलेल्या आदिवासी बांधवांना 14 जानेवारी रोजी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार 34 आदिवासींवर वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ लोकसंघर्ष मोर्चातर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

वनहक्क कायदा 2005 नुसार वनजमिनीचे सर्वोच्च अधिकार हे जिल्हाधिकार्‍यांकडे आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे लेखी आदेश प्राप्त नसताना ही कारवाई करण्यात आली असून ती बेकायदेशीर आहे. निमड्या, पिंपरकुंड शिवारातील स्थळभेट प्रत्यक्ष पाहणी ही फेब्रुवारीत 7 तारखेला आहे. त्याअगोदरच आदिवासी बांधवांना नोटीस बजावण्यात आली आहे, असे या आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. वनविभागाने दाखल केलेले गुन्हे हे नियमबाह्य असल्याने ते मागे घेण्यात यावे, यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शाम पाटील, हर्षद काकडे, भूषण वानखेडे, रेमसिंग बारेला, रमेश बारेला, कुर्बान तडवी, गाहू पावरा, प्रकाश भिल्ल, रंजित मोरे, भगवान भिल्ल यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.