आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इगतपुरीजवळ झाले दुर्मिळ गिधाडांचे ‘दर्शन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नाशिक आणि इगतपुरी तालुक्याच्या सीमेवर इंडियन लॉँगबिल्ट (लांब चोचीचे) सह इजिप्शियन (पांढरे) प्रजातीच्या गिधाडांचा अधिवास असल्याचे नाशिक व जळगाव येथील अभ्यासकांनी शोधून काढले आहे.

ऑगस्ट २०१३ मध्ये ‘व्याघ्र संवर्धन आणि संशोधन सेंटर'चे प्रसाद हिरे यांना या भागात दोन इंडियन लॉँगबिल्ट व्हल्चर दिसले होते. यानंतर त्यांनी सातत्याने निरीक्षण केले. त्यात या गिधाडांची परिसरातच वसाहत असावी, असा अंदाज समोर आला. या दृष्टीने डिसेंबर २०१४ मध्ये जळगावातील वन्यजीव संरक्षक संस्थेचे रवींद्र सोनवणे, सतीश कांबळे आणि हिरे यांच्या "टीसीअँडआरसी'च्या पथकाने पुन्हा केलेल्या पाहणीत ९ गिधाडे आढळली होती. याच पथकाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अभ्यास केला. या वेळी त्यांनी सुमारे तीन हजार फूट उंचीवरील टेकडीवरून मनसोक्त विहार करणारे लाँगबिल्ट प्रजातीचे चार आणि इजिप्शियन एक गिधाडांची छायाचित्रे टिपली. त्यांना माँटेग्यूज हॅरिअरचेही दर्शन झाले.

"व्हल्चर रेस्टॉरंट' व्हावे
संकटग्रस्त श्रेणीतील लॉँगबिल्ट आणि इजिप्शियन जातीच्या गिधाडांची घरटी आपल्याकडे दिसणे हे विशेषच म्हणावे लागेल. या भागात "व्हल्चर रेस्टारंट' सुरू झाल्यास या पक्ष्यांचे संवर्धन-संरक्षण होईल. - रवींद्र सोनवणे, संस्थापक सदस्य, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव

सुखद धक्का
इंडियन लॉँगबिल्ट आणि इजिप्शियन व्हल्चर एकाच वेळी मोठ्या संख्येने आढळणे आश्चर्याचा सुखद धक्का आहे. वन विभागाला माहिती दिली असून गिधाडांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत.
-प्रसाद हिरे, अध्यक्ष, व्याघ्र संवर्धन व संशोधन केंद्र, मुंबई