आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन कार्यालयाबाहेर नागरिकांची लांबलचक रांग, वाहतूक निरीक्षक तैनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आरटीओ कार्यालयात दलालांना बंदी घातल्यानंतर नागरिकांची स्वत: आपले काम करताना चांगलीच पंचाईत होत आहे. त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी आता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक वाहतूक निरीक्षक तैनात करण्यात आला आहे. तो कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कामाबाबत चौकशी करतो त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंद करतो; तसेच त्यांना तो कामाबाबत मार्गदर्शनदेखील करतो.

सोमवारपासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये दलालांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात शुकशुकाट झाला आहे. एजंटच नसल्यामुळे नागरिक स्वत: येऊन आपले काम करून घेत आहेत. मात्र, कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे त्यांची धावपळ होत आहे. यावर उपाय म्हणून कार्यालयाने एका वाहतूक निरीक्षकाची नेमणूक केली आहे. हा निरीक्षक नागरिकांना मार्गदर्शन करतो; त्यामुळे नागरिकांना आपले काम करणे सोयीस्कर झाले आहे.

वाहनेही प्रवेशद्वाराबाहेर
विविधकामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच उभी करावी लागत आहेत. प्रवेशद्वारावरील निरीक्षकाकडून कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर तो त्या व्यक्तीची रजिस्टरमध्ये नोंदणी करून प्रवेश देत आहे. त्यामुळे कार्यालयात दलाल मुक्तीची अंमलबजावणी १०० टक्के होत आहे.

अशी करावी कामे
लायसन्सकाढणे- वाहनचालवण्याचा परवाना काढण्यासाठी आता ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तशी प्रिंट घेऊन दिलेल्या वेळेत आरटीओ कार्यालयाच्या मुख्य इमारतीत परीक्षा घेण्यात येते. या वेळी सोबत अॅड्रेस प्रुफ, लाइट बिल, आधारकार्ड, मतदानकार्ड या पैकी एका कागदपत्राची झेरॉक्स ओरिजिनल प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील कागदपत्रांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, दोन पासपोर्ट फोटो आवश्यक आहेत.