आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशी एक्स्प्रेसमध्ये लूट; प्रवाशांनी चोरास बदडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धावत्या रेल्वेत प्रवाशांना दमदाटी करून पैसे माेबाइल लुटणाऱ्या एकाला प्रवाशांनी पकडून दिले, तर त्याचे तीन साथीदार रेल्वेची साखळी अाेढून फरार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजेदरम्यान डाऊनच्या काशी एक्स्प्रेसमध्ये हरिविठ्ठलनगर परिसराजवळ घडली. विशाल परदेशी असे या चाेरट्याचे नाव असून, त्याची प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली. गाडी क्रमांक १५०१७ असलेल्या लाेकमान्य टिळक टर्मिनल्स-गाेरखपूर काशी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून शुक्रवारी रामपूजन गुप्ता (वय २२, रा.छोगरा, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) सुनील यादव (वय १७, रा.कैनू, उत्तर प्रदेश) हे दाेघे प्रवास करत हाेते. तसेच पाचोरा स्टेशनवरून या गाडीत विशाल भगवान परदेशी (वय २३, रा.शिंदाड, ता.पाचोरा) याच्यासाेबत तीन युवक बसले हाेते.
त्यांनी म्हसावद-शिरसोलीदरम्यान गुप्ता यादवला विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे मारहाण करत त्यांनी दाेघांना शाैचालयाजवळ नेले. तेथे पुन्हा बेदम मारहाण करून गुप्ताकडील दीड हजार रुपये माेबाइल, तर यादवजवळील पाच हजार रुपये मोबाइल हिसकावून घेतला. हा प्रकार इतर प्रवासी पाहत हाेते; पण कुणीही दाेघांच्या मदतीसाठी येत नव्हते. यादरम्यान गाडी जळगाव शहरात दाखल झाल्यानंतर हरिविठ्ठलनगरजवळ प्रवासी किशोर महाजन यांनी विशालला पकडले. हे पाहून डब्यातील इतर प्रवाशांनी विशालला चोप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. या वेळी विशालच्या तीन साथीदारांनी साखळी अाेढली. त्यामुळे क्षणात गाडी थांबली अन् विशालच्या तीन साथीदारांनी डब्यातून उड्या मारून धावत सुटले.
प्रवाशांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण ते हाती अाले नाहीत. विशालला प्रवाशांनी रेल्वे पाेेलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो चाळीसगाव लोहमार्ग ठाण्यात वर्ग करण्यात आला अाहे. पुढील चौकशीसाठी विशालला मनमाड पोलिस घेऊन गेले आहेत.

किशोर महाजनांच्या धाडसाचे कौतुक
चोरटा विशाल त्याचे साथीदार गाडीत धुमाकूळ घालत दोघा प्रवाशांना मारहाण करीत होते. तरीदेखील कोणीही त्यांना हटकण्याची fgमत दाखवली नाही. अशा वेळी जळगावातील किशोर महाजन यांनी धाडस दाखवून चोरट्याला पकडून त्याची धुलाई केली.

गाडीत दिवसा गस्त वाढवण्याची गरज
दिवसा ढवळ्या लुटीच्या घटनेमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे गाडीत गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या गाड्यांमध्ये आरक्षित डब्यांमध्ये आरपीएफची नियुक्ती केली असून जनरल डब्यातही आरपीएफची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

अचानक रेल्वे थांबली; प्रवासी भयभीत
काशी एक्स्प्रेस जळगावात दाखल झाल्यानंतर अचानक थांबली. काही प्रवाशांनी गाडी खाली उतरून पाहिले त्या वेळी तीन चोरट्यांमागे प्रवासी पळत होते. या प्रकारामुळे काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज आल्याने इतर प्रवासी भयभीत झाले होते.

तिघा साथीदारांची नावे सांगितली
जळगावरेल्वेस्थानकावर आणल्यानंतर विशालने सुरुवातील गुन्ह्याची माहिती दिली नाही; पण पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच हा प्रकार केला असून, आपल्यासोबत रतिलाल परदेशी, गोपाळ पाटील (दोघे रा.शिंदाड, ता.पाचोरा) मनोज पाटील (वाडी-शेवाळे, ता.पाचोरा) हे तिघेदेखील असल्याची माहिती दिली. यापैकी दोघे आयटीआयचे विद्यार्थी असल्याचे विशालने सांगितले. तसेच यापूर्वीही असे प्रकार केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महाजन यांनी दिली. दरम्यान, विशाल हा पहिलवान असून, त्याने पाचोरा येथे कुस्त्यांच्या दंगल गाजवल्या आहेत.

जळगावातच वैद्यकीय तपासणी
यागाडीत ड्यूटीवर असलेले मनमाड येथील आरपीएफचे सहायक फौजदार एस.पी.चौरसिया, प्रेम चौधरी, कैलास बोडके, आर.डी.जुमडे प्रकाश पोवार यांनी विशालला ताब्यात घेतल्यानंतर जळगाव स्थानकावर आणले. तेथे भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद महाजन यांनी त्याला ताब्यात घेऊन शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवला. त्यानंतर त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात अाली नंतर त्याला पुन्हा मनमाड पोलिसांच्या स्वाधीन केले.